एक्स्प्लोर
शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, नाशकात पैठणी वाटल्याचा आरोप
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खुलेआम पैठणी वाटल्या जात असून दोन ते पाच हजाराची पाकिटं दिली जात असल्याचा गंभीर आरोप शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.
नाशिक/मुंबई : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 25 जून रोजी मतदान होणार आहे. मात्र निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खुलेआम पैठणी वाटल्या जात असून दोन ते पाच हजाराची पाकिटं दिली जात असल्याचा गंभीर आरोप शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.
शिक्षण क्षेत्र अधिक भ्रष्ट करणारे हे गैरव्यवहार थांबवावेत या मागणीसाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
मुंबईतही आरोप-प्रत्यारोप
दुसरीकडे विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भगवी पाकिटं येत असल्याचा गंभीर आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. एका मतासाठी 5 ते 10 हजाराचा रेट असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.
पैशाची पाकिटं येत असली तरी मुंबईकर शिक्षक विकला जाणार नाही, तो स्वाभिमानी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या 25 जून रोजी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. तर 28 तारखेला या जागांचे निकाल असतील.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम
नाशिक शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि कोकण विभागातून पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ सात जुलै रोजी संपत आहे. यासाठी 25 जून रोजी मतदान होईल, तर 28 जून रोजी निकाल आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार
नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे
मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील
मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत
कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement