एक्स्प्लोर

पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या जन्मतारखेचा घोळ, कागदपत्रांनुसार बाराव्या वर्षी दहावी उत्तीर्ण!

ऐन निवृत्तीच्या तोंडावर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक प्रताप दिघावकर यांच्या जन्मतारखेची चर्चा सुरु झाली आहे. शाळेतील कागदपत्रांनुसार प्रताप दिघावकर वयाच्या केवळ बाराव्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाले आहेत, असे समोर येत आहे.दरम्यान हे प्रकरण सरकारने बंद केलं असून 1961 हे जन्मसाल ग्राह्य धरल्याचं दिघावकर यांनी सांगितलं.

नाशिक : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) प्रताप दिघावकर यांच्या जन्मतारखेचा घोळ समोर आला आहे. याबाबत सटाणा तालुक्यातील ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले त्या शाळेशी पोलीस विभागाचा पत्रव्यवहार सुरु असून दिघावकर यांची जन्मतारीख काय नोंदवली आहे, त्यांचे वर्गमित्र कोण होते याची माहिती मागवण्यात आली आहे.

शाळेतील कागदपत्रांनुसार प्रताप दिघावकर वयाच्या केवळ बाराव्या वर्षी दहावी उत्तीर्ण झालेत असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खात्री करा आणि योग्य कागदपत्रे कार्यालयाला द्या, अशी सूचना दिघावकर यांनी शिक्षण घेतलेल्या निटाणे इथल्या नुतन इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.

प्रताप दिघावकर यांनी 1970 मध्ये शाळेत प्रवेश केला आणि 1976 मध्ये शाळा सोडल्याचा त्यांचा दाखला आहे. त्यामुळे त्यांनी कधी, कितव्या वर्षासाठी शाळेत प्रवेश घेतला याची माहिती विचारण्यात आली आहे. त्यांची जन्मतारीख 31 मे 1964 आहे यात म्हटलं आहे.

याबाबत दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण सरकारने बंद केलं आहे. माझं जन्मसाल 1961 ग्राह्य धरण्यात आली आहे. मी 1 मे रोजी निवृत्त होत आहे. माझ्याकडूनच अर्ज करण्यात आला होता. जुन्या काळी काही नोंदी केल्या जातात त्यामुळे अर्ज केला होता, पण हा विषय आता संपला आहे, असं ते म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget