एक्स्प्लोर

अखेर मुहूर्त मिळाला; एक जुलैपासून नाशिक महापालिकेची परिवहन बससेवा सुरु होणार

शहरात 27 जून पासून नव्या बसेसचे ट्रायल रन होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 डिझेल बस धावणार आहेत.  टप्प्याटप्प्याने सीएनजी आणि इलेक्ट्रिकल बस नाशिकच्या रस्त्यावर धावणार आहेत.

नाशिक : जे एस टी महामंडळाला जमल नाही ते नाशिक महानगर पालिका करणार आहे. एक जुलै पासून नाशिक नाशिक महानगर पालिकेची परिवहन बस सेवा सुरू होणार आहे. नाशिकच्या रस्त्यावर आता चकचकीत बसेस धावणार आहेत. अनेक अडचणी, आव्हानांचा सामना करत नाशिक महानगरपालिकेच्या बस सेवेला मुहूर्त मिळला आहे.

नाशिक महापलिकेत भाजपची सत्ता येण्याआधी शेवटच्या प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेनतर नाशिककरांनी भाजपच्या परड्यात भरभरून दान टाकल. भाजपला एकहाती सत्ता दिली. नाशिक दत्तक घेतनाच देवेंद्र फडणवीस  महानगर पालिकेच्या माध्यमातून परिवहन बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. शहर वाहतूक सेवा एस टी महामंडळाला परवडत नाही ती महापालिकेला कशी परवडणार असा सवाल उपस्थित करत विरोधकानी बससेवेला कडाडून विरोध केला. मात्र विरोध हाणून पाडत सत्ताधारी भाजपने प्रकल्प दामटून नेण्यास सुरवात केली. अखेर एक जुलैचा मुहूर्त साधत मनपाची परिवहन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलंय.  

शहरात 27 जून पासून नव्या बसेसचे ट्रायल रन होणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 डिझेल बस धावणार आहेत.  टप्प्याटप्प्याने सीएनजी आणि इलेक्ट्रिकल बस नाशिकच्या रस्त्यावर धावणार आहेत. नाशिक शहराच्या हद्द बाहेर गेल्या काही महिन्यांपासून या बस अक्षरक्षा: पडून आहेत. एकाच ठिकाणी उभ्या राहिल्यान बस खराब होत आहेत. त्यामुळे रोज त्यांचा मेंटेनन्स करावा लागतोय. रोज सकाळी बस दहा ते पंधरा मिनिटे सुरू ठेववाव्या लागतात. बरेच दिवस बस सुरू झाल्या नाहीत तर अनेकांची बॅटरी डिस्चार्ज होतात, टायर मधील हवा कमी होते त्यामुळे याबाबत देखभाल रोज ठेवावी लागत आहे.   

सध्या तपोवनात बस डेपो उभरण्याच काम सुरू झालायं. सुरवातीला तपोवन ते नाशिकरोड, तपोवन ते पवन नगर,  पंचवटी ते सातपूर, नाशिककरोड ते अंबड आशा महत्वाच्या नऊ मार्गावर बस धावणार आहेत. बस चालक-वाहकांची जबाबदारी बससेवा पुरविणाऱ्या कंपनीची आहे. त्यामुळे नोकरभरतीचा बोजा महापालिकेवर पडणार नसल्याचा दावा मनपा प्रशासन करत आहे. किलोमीटर प्रमाणे मनपा बिल अदा करायच आहे. कसारा, ओझरपर्यंत सीटी बस धावणार असून नाशिक दर्शन, सुला वाईन, बोट क्लबची सफर ही केली जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

एसटी महामंडळाने 5 वर्षापासून टपट्याटप्यान बस सेवा बंद करण्यास सुरवात केली. पाच वर्षापूर्वी साधारण सव्वा दोनशे बसच्या माध्यमातून 20 हजार प्रवासीची वाहतूक केली जात होती. तेव्हा दीड ते दोन कोटी रुपयांचा तोटा महामंडळाला सहन कारव लागत होता. मागील वर्षापर्यंत बस फेऱ्या 100 पर्यंत आणण्यात आल्या. मार्च 2020 पासून तर पूर्ण वाहतूक बंद करण्यात आलीय. महामंडळाने नाशिक मनपाला ना हरकत दाखलाही देण्यात आलाय. त्यामुळे शहर बस वाहतुकीतून एस टी महामंडळ मुक्त झालं आहे. इथल्या बस आणि कर्मचारी ग्रामीण भागात वर्ग करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील अनेक शहरात महापालिकेकडून सुरू असणारी बस सेवा तोट्यात आहेत. एकीकडे नागरिकांना  मूलभूत सुविधा देण्यासाठी कर्ज काढण्याचे प्रस्ताव सत्ताधारी पक्षाकडून ठेवला जात असताना दुसरीकडे हा पांढरा हत्ती कसा पोसणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget