एक्स्प्लोर
सोनू सूद आणि भाजपचा काहीही संबंध नाही : गिरीश महाजन
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदच्या पाठीमागे दुसरचं कोणीतरी असल्याचा आरोप काल केला होतायावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. तसंच कोरोनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह मंत्रिमंडळावर महाजन यांनी टीका केली.

नाशिक : सोनू सूद आणि भाजपचा काहीही संबंध नाही, असं भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदच्या पाठीमागे दुसरचं कोणीतरी असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर सोनू सूदने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. खुद्द संजय राऊत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली होती. यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं. तसंच कोरोनावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह मंत्रिमंडळावर महाजन यांनी टीका केली. यावेळी एकनाथ खडसेंच्या नाराजीच्या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलण टाळलं. गिरीश महाजन म्हणाले की, सोनू सूद आणि भाजपचा कुठलाही संबंध नाही, ते आमचे कार्यकर्तेही नाहीत. सरकार जर एकीकडे कमी पडले असेल आणि लोकांनी मदत केली असेल तर वाईट त्यात वाईट काय आहे? असा सवाल त्यांनी केला. कुणी काम करत असेल तर त्याला उगाच टारगेट करण योग्य नाही. वृत्तपत्रात जे लिहीले ते योग्य वाटत नाही, असं महाजन म्हणाले. ते म्हणाले की, देशात महाराष्ट्र कोरोना बाबत सर्वात पुढे आहे. 10-10 दिवस स्वॅब रिपोर्ट येत नाहीत. केंद्राकडून सरकारला सर्व मदत येते आहे. अॅम्बूलन्सही नवीन घेतल्या गेल्या पाहिजे, कारण प्रादुर्भाव खूप वाढतो आहे. कामात सुधारणा करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. मंत्रिमंडळात फिल्डवर येऊन कोणीच काम करत नाही. फक्त हात स्वच्छ धुवा, हळद दूध प्या असं म्हणून चालणार नाही. घरात बसून बाईट देत दुसऱ्याना लढा म्हणणे ही मानसिकता योग्य वाटत नाही, आपण मैदानात यायला हवं, असा टोला देखील त्यांनी लगावला. Sonu Sood Special Report | सोनू सूदच्या मदतकार्यावरून भाजप-शिवसेनेत 'सामना' संजय राऊत यांच्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद ‘मातोश्री’वर; वादावर पडदा पडण्याची शक्यता काय म्हणाले होते संजय राऊत सोनू सूद देवदूत वगैरे नाही. हा निव्वळ माध्यमं आणि पीआर एजन्सीजचा खेळ आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, अशी टीका संजय राऊत यांनी सामनातील 'रोखठोक'मधून केली आहे. ते म्हणाले होते की, लॉकडाऊनच्या काळात आम्हाला विमानं मिळत नव्हती, तर यांना कुठून मिळाली? याचा अर्थ याला कोणीतरी मागून ऑपरेट करत होतं. या काळात कोणीच काम करत नव्हतं, सोनू सूद आपला एकटाच बाहुबली. महाराष्ट्र आणि दिल्ली सरकार आणि अनेकांनी कामं केली नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता. सोनू सूद देवदूत वगैरे नाही, करोडो रुपये येतात कुठून? : संजय राऊत सोनू सूदचा मजुरांना मदतीचा हात कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारनं देशभरात लॉकडाऊनची घोषणी केली. त्यानंतर अनेक परप्रांतीय मजूर, कामगार मुंबईत अडकून पडले होते. हातात असलेलं काम गेल्याने आणि कोरोना सारख्या महामारमुळे त्यांना मुंबईत राहणे अशक्य झालं होतं. त्यामुळे त्यांनी मिळेत त्या मार्गाने, वाहनाने किंवा पायी आपली घरची वाट धरली. मात्र हे करत असताना मजुरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या दरम्यान अभिनेता सोनू सूदने या मजुरांना मदतीचा हात दिला आणि शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची त्याने सोय केली. मात्र मजुरांसाठी हिरो ठरलेल्या सोनूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण























