एक्स्प्लोर
नाशिकमध्ये मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई, 800 दुकानं जमीनदोस्त

नाशिक : नाशिकच्या महापालिकेनं भंगारबाजारात आज सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आहे. यात जवळपास 800 पेक्षा जास्त दुकानं जमीनदोस्त झाली आहेत. या कारवाईवेळी महापालिकेनं मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवला होता. नाशिकच्या अंबड लिंक रस्त्यावर 30 ते 40 एकर परिसरात पसरलेलं भंगार मार्केट आज पालिकेनं जमीनदोस्त केलं आहे. गेली 17 वर्ष पालिका भंगार बाजारातील अतिक्रमणाविरोधात न्यायालयीन लढा देत होती. 2015 साली न्यायालयानं भंगार बाजार हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भंगार बाजारातील दुकानांना पालिकेनं अनेक वेळा नोटीस बजावली होती. मात्र नोटीस बजावूनही 800 दुकानांपैकी एकही दुकान जागचं हललं नव्हतं. त्यामुळे आज पालिकेनं धडक कारवाई करत हा भंगार बाजार उद्धस्त केला. या कारवाईसाठी सुमारे 100 जेसीबी आणि पोकलेनचा वापर करण्यात आला. तसंच बंदोबस्तासाठी 1 हजार पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं होतं. पाहा व्हिडीओ :
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
क्रिकेट
मुंबई

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















