Nashik: अंकुश शिंदे नाशिकचे पोलिस आयुक्त, तर विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनिल फुलारी
नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) हे नवे आयुक्त असतील.
नाशिक: राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अंकुश शिंदे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी बदली झाली आहे. तर नाशिक परिक्षेत्राचे नवे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. अंकुश शिंदे हे या आधी पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते.
राज्य शासनाने वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांचीही बदली झाली असून, त्यांच्या जागी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक शहर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे हे नऊ महिन्यांपूर्वी बदली होऊन आले होते. आज राज्य सरकारने पुन्हा एकदा त्यांची बदली केली आली आहे. तसेच अंकुश शिंदे हे आता नाशिक शहर पोलिस आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले आहेत. त्यात नाईकनवरे यांच्या बदलीचाही समावेश आहे. तर अंकुश शिंदे हे पिंपरीचिंचवडच्या पोलीस आयुक्त पदी होते. त्यांच्याकडे आता नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. नाईकनवरे यांनी नऊ महिन्यांपूर्वी नाशिक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. विशेष नाशिक शहरात मागील काही वर्षांत एकही पोलिस अधिकारी अधिक काळ टिकला नसल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे सध्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना अवघ्या नऊ महिन्यातच आयुक्त पदाचा कारभार सोडावा लागणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात ते अपयशी ठरत असल्याचं गेल्या काही महिन्यांपासून बघायला मिळत होतं. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून धुरा सांभाळणार असून शिंदे यांनी नाशिक ग्रामीण अधीक्षक म्हणून यापूर्वी देखील काम केलं आहे. त्यामुळे आता नाशिकच्या गुन्हेगाराना वचक बसणार का हे पहावं लागेल.
आज राज्यातील 30 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक असतील. तसेच बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील.