एक्स्प्लोर
नाशिकमधील 18 हजार शिक्षकांचा आणखी एक महिना पगाराविना
नाशिक : जिल्हा बँकेत खातं असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या 18 हजार शिक्षकांना अजून एक महिना तरी पगार मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण 40 कोटी इतकं चलन उपलब्ध नसल्यानं आरटीजीएसचा पर्याय स्विकारला तरी त्यासाठीही जादा मनुष्यबळ नाही असं सांगत स्टेट बँकेने शिक्षकांच्या पगाराला रेड सिग्नल दाखवला आहे.
गुरुवारी थकीत पगारासाठी शिक्षकांनी अचानकपणे गडकरी चौकात रास्ता रोको आंदोलन केलं होतं. विभागीय सहनिबंधकांनी पैसे उपलब्ध नसल्याचं सांगत पगारास नकार दिल्यानं शिक्षकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. हे आंदोलन करणाऱ्या 105 शिक्षकांवर मुंबईनाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं थकलेला पगार तर मिळाला नाहीच, मात्र पगारासाठी आंदोलन केल्यामुळं गुन्हे झाल्याची वेळ नाशिक जिल्ह्यातल्या शिक्षकांवर आली आहे.
एनडीसीसी बँकेत खातं असलेल्या शिक्षकांना 6 महिन्यांपासून आपले पगार काढता आलेले नाहीत. चेक क्लिअर होत नसल्यानं शिक्षकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement