Nashik News : विधानसभा निवडणुकीत येवल्याची जागा ठाकरे गटाला सोडा, शिष्टमंडळाची मागणी, उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?
Nashik Politics : येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळांनी उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे केली आहे.
नाशिक : येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात (Yeola Lasalgaon Assembly Constituency) 1995 ते 2004 या कालावधीत शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने 50 हजारापेक्षा अधिक मत घेतली आहे. शिवसेनेचा हा पारंपारिक मतदारसंघ असून होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ही जागा शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) सोडण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळांनी नाशिक दौऱ्यावर उपनेते रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) यांच्याकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना निवडून आणण्यात शिवसेना पक्षाचा मोठा वाटा आहे. कोर बैठकीत हा निर्णय घेऊन येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडावी, अशी लेखी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे येवला - लासलगाव मतदारसंघाचे संघटक शिवा सुरासे यांनी दिली आहे.
येवल्याची जागा ठाकरे गटाला सोडावी
शिवा सुरासे म्हणाले की, येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नाशिकमध्ये शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडावा, अशी मागणी शिष्टमंडळाने रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे केली आहे. 1995 पासून शिवसेना ही जागा लढवत आहे. 50 हजारांहून अधिक मते गेल्या सात ते आठ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारी घेतली आहेत.
शिवसेनेचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार
2014 आणि 2019 सालच्या निवडणुकीत तब्बल 70 हजारापर्यंत मतदान शिवसेनेच्या उमेदवाराला झाले आहे. सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासोबत आपला संघर्ष होत असतो. तरी 2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघात द्यावा. शिवसेनेचा उमेदवार शंभर टक्के या मतदारसंघात निवडून येईल. त्यामुळे हे जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी आम्ही नाशिक येथे झालेल्या बैठकीत केली. याबाबत आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याकडेही आम्ही या मतदारसंघाची मागणी करणार आहोत. 1995 ते 2004 सालापर्यंत या मतदारसंघात शिवसेनेचा आमदार होता. आता पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघात फडकणार असल्याचे शिवा सुरासे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा