एक्स्प्लोर

Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेत नाशिकवर कब्जा करण्यासाठी ठाकरे गटाची खास रणनीती, सहा जागांवर दावा करणार

Nashik Vidhan Sabha : शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकच्या मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. जिल्ह्यातील पाच ते सहा जागांवर ठाकरे गट दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे.  

Nashik Politics नाशिक : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात घवघवीत यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) जोरदार तयारी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील विविध मतदारसंघ काबीज करण्यासाठी मविआकडून रणनीती आखली जात आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाशिकच्या विधानसभा मतदारसंघांची चाचपणी केली होती, आता यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) नाशिकच्या मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. 

नाशिकमध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ येतात. यात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नांदगाव, येवला, बागलाण, कळवण, दिंडोरी, निफाड, चांदवड या मतदारसंघांचा समावेश आहे.  नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. यापाठोपाठ भाजपचे पाच आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार, तर काँग्रेस आणि एमआयएमचे प्रत्येकी एक आमदार आहेत. शिवसेनेचे नाशिकमध्ये दोन आमदार होते मात्र दोन्ही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेची वाट धरली. त्यामुळे नाशिकच्या जागा जिंकण्यासाठी आता शिवसेना ठाकरे गटाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.  

पाच ते सहा जागांवर ठाकरे गट करणार दावा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चाचपणी केली जात आहे. येवला, मालेगाव बाह्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, इगतपुरी, सिन्नर या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून नाशिक जिल्ह्यात पाच ते सहा जागांवर उद्धव ठाकरे दावा करणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते रवींद्र मिर्लेकर नाशिकमध्ये विधानसभा निहाय आढावा बैठक घेत आहेत. जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघांचा ठाकरे गटाकडून आढावा घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची ताकद, आम्हाला लोकसभेला चांगले यश मिळाले आहे. मात्र आघाडी असल्याने चर्चा करूनच जागावाटप होतील, असे रवींद्र मिर्लेकर यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Bhaskar Bhagare : 'साधा शिक्षक खासदार झाला, ती किमया म्हणजे शरद पवार; भास्कर भगरेंची स्तुतीसुमने', पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणा

Gokul Zirwal : माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, संधी मिळाली तर वडिलांविरोधात लढणार; नरहळी झिरवाळांच्या मुलाचा विधानसभेला शड्डू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thorat on MVA : महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती, राहिलेलं जागावाटप लवकरच होईलABP Majha Headlines : 01.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivajiRao AdhalRao on Ajit pawar Melava : शिवाजीराव आढळराव पाटलांनी फिरवली अजित पवारांच्या आळंदी दौऱ्याकडे पाठTOP 50 : बातम्याचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
Malaika Arora Father Death :  मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
Tata Motors Cars Discount : टाटांची मोठी ऑफर, फक्त 5 लाखात मिळणार कार, किती मिळतेय सवलत? 
Tata Motors Cars Discount : टाटांची मोठी ऑफर, फक्त 5 लाखात मिळणार कार, किती मिळतेय सवलत? 
Rajendra Raut: ... तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालावा; आमदार राऊतांचे आवाहन, बार्शीत ठिय्या
... तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालावा; आमदार राऊतांचे आवाहन, बार्शीत ठिय्या
मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही; अजितदादांचा संताप
मुस्लिम समाजाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाही; अजितदादांचा संताप
Embed widget