एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : मोदी हे बिनडोक, पगला; इंडिया नाव असलेल्या नोटा पण बदलेल; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar : बोचऱ्या शब्दांंमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे बिनडोक आणि पगला व्यक्ती आहेत. आता 'इंडिया'ऐवजी भारत लिहिले जाणार. सगळी पुस्तकं बदलणार, त्यासाठी 40 हजार कोटींचा खर्च येणार आहे. पगला बाबा असतो तो चांगले कपडे काढतो आणि तसाच फिरतो. आपण म्हणतो जाऊ द्या तो पगला आहे, आहे तसा स्वीकारा. हा मोदी पण पगला आहे की नाही? अशा बोचऱ्या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदींना जेवढे लवकर सत्तेवरून खाली खेचाल तेवढी देशाची तिजोरी वाचेल अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने (Vanchit Bahujan Aghadi) नाशिकमध्ये आदिवासी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आदिवासींच्या मोर्चामुळे आदिवासींना आपल्या अधिकाराची, हक्काची जाणीव झाली. आता आपली जबाबदारी आहे की आपण सगळे एकत्र आले आहोत. भिल्ल, कोकणा, वंचित, एससी वेगळा लढणार नाही. एकत्र लढून देशाची सत्ता हातात घेऊ, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. आदिवासींना धनगरांविरोधात आणि ओबीसींना मराठा विरोधात करायला सुरुवात झाली आहे. हे षडयंत्र केंद्रातील आणि राज्यांतील सरकार करत असून  हे भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार आहे विसरू नका, असेही आंबेडकर यांनी म्हटले. मार्च किंवा एप्रिल अगोदर लोकसभा निवडणुका होतील असा अंदाज त्यांनी वर्तवला. उद्या कोण निवडून येतील यापेक्षा मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ येणार नाही ही खूणगाठ आपण बांधली पाहिजे असेही आंबेडकर यांनी म्हटले. 

काल मुस्लिम आणि आदिवासी-ख्रिश्नचन लक्ष्य, उद्या कोणावर हल्ले?

आज काँग्रेसची वर्किंग कमिटी जेलमध्ये आहे. हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. आताची लढाई जनतेची आहे. जनतेला शांतता पाहिजे की दंगल? असा प्रश्नदेखील त्यांनी केला. गोध्रा, मणिपूर जळाले. गोध्रात मुसलमान आणि मणिपूरमध्ये आदिवासी ख्रिश्ननांवर हल्ला झाला. उद्या तुमच्या आमच्यावर प्रयोग होणार असल्याची भीती आंबेडकरांनी व्यक्त केली.

मोदी बिनडोक व्यक्ती...

इस्त्रायल-हमास युद्धात तिकडे मिसाईलचा हल्ला पॅलेस्टाईनमध्ये होत आहे. इस्त्रायलच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पण इस्रायलला पाठिंबा कोणी दिला तर नरेंद मोदींनी. हे बिनडोक आहे, त्याचा नमुना डोक्यात ठेवायचा आहे
तो बिनडोक आहे. पंतप्रधान इस्रायलला पाठिंबा देतात तर त्यांचा अधिकारी पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याची भूमिका सांगतो, याकडे प्रकाश आंबेडकरांनी लक्ष वेधले. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा किस्साही आंबेडकर यांनी सांगितला. जो बायडन काहीतरी सांगतात आणि मोदी हसत असल्याचे  आपण पाहिले असेल. बायडन मोदीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदीने उजव्या हातात त्याचा ग्लास धरला त्यात लाल रंगाचे पाणी होते. बायडन लाल म्हणजे काय ते माहिती नव्हते, उजव्या नाही तर डाव्या हातात धरायचे आहे हे सांगायचे होते. लोकं समजतील तू दारू पितो आहे म्हणून ग्लास दुसऱ्या हातात घे असे बायडनला सांगायचे होते. पण मोदी हसत होते. असा बिनडोक माणूस आपल्याला चालेल का? असा सवालही आंबेडकर यांनी केला. इथल्या सनातनांना सांगतो. भारताची छि छु होऊ देऊ नका, जगभरात नाव खराब होत असल्याचे त्यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaJogeshwari East Rada: जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडलेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :13 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Sharmila Thackeray On Uddhav Thackeray:  राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
राजा तेव्हा बंगल्यावर होता...; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं!
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Embed widget