Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत पाच बोगस मतं आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून याबाबत शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे.
![Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग Uddhav Thackeray calls Shiv Sena activists after finding five bogus votes in Nashik teacher constituency election Maharashtra Marathi News Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/91733128c5fd5dc3d255b8e94f6438541719820536607923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत दोन वेळेस जास्त मतपत्रिका आढळून आल्या आहेत. एकूण पाच बोगस मतपत्रिका जास्त आढळल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena Thackeray Camp) यावर आक्षेप घेण्यात आला. आता या प्रकरणाची शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेत ज्या ज्या भागात शिवसेना ठाकरे गटाचे मतदान जास्त आहे, त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने पार पडत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात जास्त मतपत्रिका आढळल्याची माहिती मिळत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली आहे.
उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला
उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन करत नेमकी काय घटना घडली याबाबतची माहिती घेतली. जर मतपत्रिका सील केलेल्या असतील तर पाच मतपत्रिका जास्त आल्या कशा? आणि कुठल्या जिल्ह्यातल्या याबाबतची माहिती उद्धव ठाकरेंनी घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाने यावर नेमका काय आक्षेप घेतला आणि त्याचे पुढे काय होणार याची देखील त्यांनी माहिती घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे प्रत्येक मतदारसंघाकडे बारीक लक्ष असल्याचे दिसून येत आहे. नाशिकच्या प्रकाराबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर?
दरम्यान, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना म्हटले की, चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी. मटपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय आहे. ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते, त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)