एक्स्प्लोर

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाणीचा आरोप, जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, घेतला मोठा निर्णय

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा प्रकार घडला. आता या प्रकरणी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. सुरक्षारक्षकांनी मारहाण केली असेल तर सर्वात पहिले कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

नाशिक येथील महेंद्र सूर्यवंशी आणि त्यांचे आई-वडिलांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर जाण्याची घाई केली. त्यावेळी महेंद्र यांची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी भाविकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे.

दोषींवर कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, काल नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाला त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेताना धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याच्या प्रकरणावर आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसाठी वेळेत दर्शन होईल आणि योग्य त्या सुविधा प्रशासन आणि मंदिर प्रशासनाकडून मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली. 

मंदिराच्या विश्वस्तांचे स्पष्टीकरण 

या प्रकाराबाबत मंदिर समितीच्या विश्वस्तांकडून खुलासा करण्यात आला आहे . सलग सुट्ट्या असल्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गर्दी जास्त असल्याने सुरक्षारक्षकांनी संबंधित भाविकांना पुढे जाण्यास सांगितले.  मात्र संबंधित भाविकांनी चार धामचे तीर्थ चढवण्यासाठी आग्रह धरला. एक वयोवृद्ध महिलेचे पाय अडकून ती खाली पडली. याच आग्रहामुळे वाद झाला, आम्ही या प्रकरणी चौकशी करत आहोत, चौकशी करून कारवाई करू, असे स्पष्टीकरण मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी आहे. 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक 

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासना समवेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर ट्रस्टला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Crime : कट्टा विक्री भोवली, नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला बेड्या, गावठी कट्ट्यांसह काडतुसे जप्त

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! दारू पिताना मित्रांमध्ये उफाळला वाद, दगडानं ठेचून 28 वर्षीय युवकाला संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Satish Wagh Case : सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडेPune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Cristiano Ronaldo : सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
सौदीत क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डोने इस्लाम धर्माचा स्वीकार केला? त्या व्हायरल फोटोंमागील सत्य काय?
Satish Wagh Case : सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
सतीश वाघ यांची हत्या होणारी तीन कारणं आली समोर; पोलिसांनी सांगितली सर्व हकिकत, नेमकं काय घडलं?
 Ladki Bahin Yojana : अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत स्पष्टच सांगितलं 
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अदिती तटकरे देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत म्हणाल्या... 
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
Virat Kohli Fined for Sam Konstas : अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
Crime News : मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, पत्नीनेच सतीश वाघ यांचा काटा काढला; पतीच्या हत्येचं 'फूल प्लॅनिंग'
मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, पत्नीनेच सतीश वाघ यांचा काटा काढला; पतीच्या हत्येचं 'फूल प्लॅनिंग'
Embed widget