Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर हाजीर हो! न्यायालयाचे आदेश, महापालिकेच्या कंत्राटात अपहार केल्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा
Sudhakar Badgujar : शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत अपहाराचा गुन्हा नोंद आहे. त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Sudhakar Badgujar नाशिक : महापालिकेच्या कंत्राटात अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) महानगरप्रमुख संशयित सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अटकपूर्व जामिनाची मुदत संपल्यावर न्यायालयात (Court) हजर न झाल्याने बडगुजरांविरुद्ध न्यायालयाने आक्षेप नोंदवला आहे.
या प्रकरणातील तिन्ही संशयितांना 17 जानेवारी रोजी हजर होण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांत अपहाराचा गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी 22 डिसेंबर रोजी एसीबी कार्यालयात बडगुजर यांची चौकशी झाली.
अटकपूर्व जामीन झाला होता मंजूर
त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे सादर केल्यावर 10 जानेवारीपर्यंत मुदत मागितली.अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार 29 डिसेंबर रोजी पोलीस तपासात सहकार्य करण्यासह इतर अटी-शर्तीद्वारे बडगुजर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.
कोर्टात हजर राहण्याचे निर्देश
9 जानेवारी रोजी सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामिनाची मुदत संपली, न्यायालयाने सुधाकर बडगुजर यांसह संशयित साहेबराव शिंदे व सुरेश चव्हाण यांना 17 जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
महापालिकेत ठेकेदारपासून ते शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवास विलक्षण राहिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. शिवसेना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली आहे.
नितेश राणेंचा बडगुजरांवर आरोप
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी पार्टी केल्याचा आरोप नागपूर अधिवेशनात आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. नितेश राणेंच्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली.
बडगुजरांचे स्पष्टीकरण
2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सभा घेतली होती. त्यावेळी आम्ही आंदोलन केले होते. त्यावेळी मला अटक झाली आणि मी 15 दिवस तुरुंगात होतो. राजकारणामध्ये मी आलो तेव्हा माझ्यावर एकही केस नव्हती. सलीम कुत्ताला आधीच अटक झाली असेल. त्यामुळे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे आरोप बेबनाव आहेत, मॉर्फिंग केलेले आहेत आणि मला मान्य नाहीत, असे स्पष्टीकरण सुधाकर बडगुजर यांनी दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या