(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या जामिनावर 24 जानेवारीला फैसला, निकालाकडे सर्वांचे लक्ष
Nashik News : शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांत महानगरपालिकेच्या रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
Sudhakar Badgujar नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांत महानगरपालिकेच्या रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. 20) न्यायालयात सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामिनावर (Anticipatory Bail) सुनावणी झाली.
न्यायालयात सरकारी पक्ष आणि सुधाकर बडगुजर यांच्याकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. आता बुधवारी (दि.24) याप्रकरणी निर्णय दिला जाणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नगरसेवक पदाचा गैरवापर करून कंपनीला शासकीय कंत्राट मिळवून दिले आणि महानगरपालिका प्रशासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणूक व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
बडगुजरांना याआधी अटकपूर्व जामीन झाला होता मंजूर
22 डिसेंबरला एसीबी कार्यालयात सुधाकर बडगुजरांची चौकशी झाली होती. त्यांनी कागदपत्रे सादर केल्यावर 10 जानेवारीपर्यंत मुदत मागितली होती. तसेच अटकपूर्व जामिनासाठी बडगुजर यांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. 29 डिसेंबरला पोलीस तपासात सहकार्य करण्यासह इतर अटी शर्तीद्वारे बडगुजरांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता.
सरकारी वकील अजय मिसर यांनी केले पुरावे सादर
9 जानेवारीला जामिनाची मुदत संपल्यावर बडगुजर न्यायालयात हजर झाले नाही. त्यानंतर गेल्या बुधवारी झालेल्या सुनावणीत बडगुजर हजर होते. यावेळी सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करीत बडगुजर यांनी कंपनीच्या नावे घेतलेले कर्ज, जागा खरेदी, वाहन खरेदी याबाबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देऊन कागदपत्रांचे पुरावे सादर केले होते.
बडगुजर यांच्या वकिलांकडून विरोध
जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या सुनावणीत बडगुजर यांच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाकडून अॅड. पंकज चंद्रकोर यांनी बाजू मांडली. यावेळी सखोल तपासासाठी संशयितांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाला चंद्रकोर यांनी युक्तिवादात सांगितले. तर सरकार पक्षाच्या या युक्तिवादाला आक्षेप घेत बडगुजर यांच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला. आता बुधवारी (दि. 24) याप्रकरणी निकाल दिला जाईल.
आणखी वाचा