एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Lok Sabha Constituency : उमेदवारीसाठी नावाची घोषणा होताच गोडसे समर्थकांचा जल्लोष, शांतिगिरी महाराजांचे काय?

Nashik Lok Sabha Constituency : हेमंत गोडसेंच्या नावाची श्रीकांत शिंदेंनी घोषणा करताच गोडसे समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला.

Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shiv Sena) रस्सीखेच सुरू असतांनाच, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी काल सायंकाळी नाशिकमध्ये (Nashik) आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या (Hemant Godse) नावाची घोषणाच करून टाकली.  त्यांची हीच घोषणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतेय. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीची (NCP) यावर भूमिका काय? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, आपल्या नावाची घोषणा झाल्यानंतर हेमंत गोडसेंनी 'एबीपी माझा'ला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'गेल्या दहा वर्षात मी केलेली विकासकामे आणि संघटना बांधणी बघता मला पुन्हा ही संधी देण्यात आली असून, विजयाची हॅटट्रिक होणार की नाही? हे नाशिकची जनता ठरवेल. माझी उमेदवारी घोषित झाल्याने कोणाला नाराज होण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी महायुतीतील इतर इच्छुक उमेदवारांना लगावलाय. 

हेमंत गोडसेंच्या नावाची श्रीकांत शिंदेंनी घोषणा करताच गोडसे समर्थकांकडून रात्री उशिरापर्यंत जल्लोष साजरा करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करत पुष्पगुच्छ देत गोडसेंचा सत्कार करण्यात आला, त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात. सोबतच आता कामाला लागा अशा सूचना देखील कार्यकर्त्यांना देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

शांतिगिरी महाराजांचे काय? 

स्वामी शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj)  यांनी देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. महायुतीकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली होती. तर, शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीसाठी भाजपमधील काही नेते देखील आग्रही आहेत. असे असतांना श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केल्याने शांतिगिरी महाराजांचे काय होणार अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे उमेदवारी न मिळाल्यास शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा आहे. 

हेमंत गोडसे काय म्हणाले? 

उमेदवारी जाहीर झाल्यावर पहिली प्रतिक्रिया देतांना हेमंत गोडसे म्हणाले की, "खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब काम करतायत, मी पण विकासकामे, संघटना बांधणीसाठी मेहनत घेतली आणि हिच परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ही जागा धनुष्यबाणाला राहील अशी घोषणा केली. मला असं वाटतय की सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लोकाभिमुख कामे करतायत. मोदी साहेबांच ही खंबीर नेतृत्व मिळालय. 370, राम मंदिर असे धाडसी निर्णय घेतले आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवारच निवडून येईल, असे गोडसे म्हणाले. 

प्रत्येकजण उमेदवारीसाठी स्पर्धा करत असतो

मला विश्वास आहे की, 18 शिवसेनेचे खासदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेत आणि त्या पुन्हा द्यावेत अशी मागणी आमची मुख्यमंत्र्यांकडे आहे. अडचणींचा काही भाग नाही, वरिष्ठ निर्णय घेत असतात. कोणी नाराज होण्याची गरज नाही. प्रत्येकजण उमेदवारीसाठी स्पर्धा करत असतो आणि प्रत्येकाला तिकीट देणे शक्य नसते. नाशिक लोकसभा मतदारसंघात 10 टक्के फक्त माझा दौरा बाकी, दोन दिवसात पूर्ण होईल. अधिक बांधणीवर जोर असेल. तसेच हॅटट्रिक होणार का? हे नाशिकची जनता ठरवेल, असे हेमंत गोडसे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Lok Sabha Election Nashik : शांतिगिरी महाराजांच्या एन्ट्रीने नाशिकचे राजकारण तापलं; हेमंत गोडसेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAnantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget