Uddhav Thackeray: नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन
बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनानिमित्त ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे
LIVE
Background
Uddhav Thackeray Sabha Live Updates: आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून आणि ध्वजवंदन करून अधिवेशनाला सुरूवात होईल. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अधिवेशन सुरु राहणार आहे... उद्धव ठाकरे यांच्या भाषणानं अधिवेशनचा समारोप होईल. संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
Uddhav Thackeray : निवडणुकांमुळे मोदींना महाराष्ट्राची आठवण; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. मोदींचे दौरे वाढले आहेत. जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा म्हणून तिकडे गेले नाहीत. इकडे 48 जागा म्हणून येतात. महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. तेव्हा राज्य सरकारने मागणी करून ही निधी दिला नाही. पण, गुजरातला न मागताही निधी दिला. हिंदूमध्ये विष पेरतात. भेदभाव करतात. देशासाठी 'मन की बात' गुजरातसाठी 'धन की बात' करता अशा शब्दात ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
Sanjay Raut : ...तर दारावर लाथ मारून आतमध्ये जाऊ : संजय राऊत
1994 ला देखील दार उघड बये दार उघड अशी घोषणा होती. आताही तीच घोषणा आहे. या ही पुढे अजून सांगतो दार जर नाही उघडलं तर दार तोडून नाही तर दारावर लाथ मारून आतमध्ये जाऊ, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
Sanjay Raut : संजय राऊत सभा स्थळी दाखल
मंगळवारी सकाळी ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले. आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पार पडणार आहे. या सभेसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सभास्थळी दाखल झाले आहेत.
Shivsena UBT : दार उघडं बये, दार उघडचे साकडं घालत जगदंबेचा होणार जागर
शिवसेना ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेने होणार आहे. सभेला राज्यातील उबाठा गटाचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सभेच्या व्यासपीठावर तुळजा भवानीची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दार उघडं बये, दार उघडचे साकड घालत जगदंबेचा जागर करण्यात येणार आहे. 1994 च्या अधिवेशनात हाच जागर करण्यात आला होता, त्यानंतर 1995 ला विधिमंडळची दारं शिवसेनेसाठी खुली झाली होती. विधिमंडळवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. तसेच व्यासपीठाच्या उजव्या बाजूला कारसेवकांना स्वंतत्र व्यासपीठ बनवण्यात आले आहे.
Ambad Danve : "सरकारकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा, महाराष्ट्रात लबाड सरकार"; अंबादास दानवेंचा बाण
शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन पार पडले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. सरकारकडून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा सुरु आहे. महाराष्ट्रात लबाड सरकार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.