Shirdi Crime: शिर्डीत काँग्रेस शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला; "हे दहशतवादी कृत्य", बाळासाहेब थोरातांचा आरोप
संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) आश्वी गावात (Ashvi Village) झालेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना काँग्रेसच्या शहराध्यक्षावर हा हल्ला झाला आहे.
![Shirdi Crime: शिर्डीत काँग्रेस शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला; Shirdi Crime News deadly attack on Congress city president in Shirdi This act of terrorism allegation by Balasaheb Thorat maharashtra News Shirdi Crime: शिर्डीत काँग्रेस शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला;](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/5cd71928e04bb375ced296b3342e9ebd170424684113288_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shirdi Crime News : शिर्डी : एका धक्कादायक घटनेनं शिर्डी (Shirdi News) हादरलं आहे. काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर (Shirdi City President of Congress Party) प्राणघातक हल्ला झाला आहे. संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) आश्वी गावात (Ashvi Village) झालेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यक्रमानंतर परतत असताना काँग्रेसच्या शहराध्यक्षावर हा हल्ला झाला आहे. दहा ते बारा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात हा हल्ला झाला आहे.
काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले हे काल (मंगळवारी) सायंकाळी कार्यक्रमावरून घरी परतत होते. त्यावेळी दहा ते बारा जणांनी अचानक गाडी समोर आणली आणि त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. राहता तालुक्यातील लोणी गावात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सचिन चौगुले आणि त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे दोघे जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघांनाही संगमनेर तालुक्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी चौगुले यांची इस्पितळात जाऊन भेट घेतली. यावेळी इस्पितळाबाहेर मोठी गर्दी जमली होती. आजची घटना ही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी सचिन चौगुले यांनी विखे पाटलांवर निशाणा साधत टीका केली होती. त्यानंतर हा हल्ला झाल्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाद समोर आला आहे. नेमका हल्लेखोर कोण? हे शोधण्याचं पोलिसांसमोर आता आव्हान असून पोलीस काय कारवाई करतात, याकडे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे. जर योग्य कारवाई केली नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)