मालेगावची जागा 100 टक्के बदलणार, भुसेंच्या मतदार संघात संजय राऊत यांचा विश्वास
Sanjay Raut : मालेगाव शहरात उद्धव ठाकरे यांची 26 मार्च रोजी सभा होणार आहे.
Sanjay Raut : राज्यात शिवसेनेवर होणारे आघात बघता जनतेच्या मनात चिड आहे. मालेगावात शंभर टक्के बदल होणार असून उत्तर महाराष्ट्राचे अद्वय हिरेंनी नेतृत्व करावे. त्याशिवाय मालेगावची जागा ही शिवसेनेची असून येणाऱ्या काळात अद्वय हिरे सभागृहात दिसतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील मालेगाव शहरात उद्धव ठाकरे यांची 26 मार्च रोजी सभा होणार असून त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज पाहणीसाठी मालेगावात होते. यावेळी त्यांनी मालेगाव येथे मोठी सभा होणार असून उत्तर महाराष्ट्रातील या सभेला न भूतो न भविष्यती गर्दी होणार आहे. मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा असून या सभेचे अद्वय हिरेच सगळं बघत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाने लबाडी केली, लोकशाहीची हत्या केली. मात्र आगामी निवडणुकीत लढू आणि जिंकू असा विश्वास राऊत यांनी व्यक्त करत हे सरकार बेकायदेशीर असून 6 महिन्यात त्यांनी सह्या केलेले, निर्णय सर्व बेकायदेशीर असल्याचे राऊत म्हणाले.
मालेगावात असलेले प्रेम आज पाहिले हे प्रेम शिवसेनेवरचे प्रेम आहे. 26 मार्च तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या सभेचे नियोजन अद्वय हिरे पाहतील. शिवाय पक्की खात्री पटली की उत्तर महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू असून 2024 आधीच स्पॉट होईल. ज्या पद्धतीने प्रघात सुरू आहेत आहेत, ते जनता जाणून आहे. मात्र आता मालेगावात 100 टक्के बदल होणार असून भाऊसाहेब हिरेंनी जो स्वाभिमान दाखवला. त्यांचा नातू आमच्या सोबत असून इतिहासात ही सभा मोठी असणार असल्याचे राऊत म्हणाले.
मालेगावची जागा ही शिवसेनेची....
निवडणूक आयोगाने लांडया लबाड्या करू निकाल दिला असून सत्ता जाणार हे कळाल्यानंतर हे सर्व घडते आहे. हे सरकार बेकायदेशीर असून त्यांच्या प्रत्येक निर्णयावर विचार करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर राऊत म्हणाले की, उत्तर कोर्टात देणार असून रामदास कदम यांच्याकडे दुर्लक्ष करा. या देशातील न्याय अद्याप मेलेला नाही. हा महाराष्ट्र राम राज्याचा आहे.त्यामुळे निकाल आपल्या बाजूने लागेल. मालेगावची जागा ही शिवसेनेची असून येणाऱ्या काळात अद्वय हिरे सभागृहात दिसतील. शेतकरी कष्टकरी रस्त्यावर असून सरकार कडे नैतिकता नाही की काही निर्णय घेतील. लोकसभेसाठी आदित्य ठाकरे यांना सभा घेण्यासाठी सांगणार असून ज्यांना शिवसेनेने सर्वकाही दिले हे सोडून गेलेत, त्यांना पुन्हा घेणार नसल्याचे राऊत म्हणाले.