एक्स्प्लोर

पंचवटीतील भोरे कला मंदिर धुळखात, नाशिक मनपाचे सपशेल दुर्लक्ष, फडणवीसांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात झाले होते उद्घाटन

Sadhashiv Bhore Kala Mandir : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदाशिव भोरे कलामंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. 

नाशिक : पंचवटी (Panchavati) येथील हिरावाडी (Hirawadi) परिसरातील स्व. सदाशिव भोरे कलामंदिर (Sadashiv Bhore Kala Mandir) हे उद्घाटनानंतरही कलाकारांसाठी खुले न केल्यामुळे कलाकारांकडून नाराची व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते फित कापून या कलामंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते. 

नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) पाच एकरात 25 कोटींचा निधी खर्चून हे भव्य असे कला मंदिर उभे केले आहे. कला मंदिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून यंत्रणा देखील उभी करण्यात आले आहे. कोट्यवधींच्या वस्तू अधिक काळ बंद राहिल्यास त्या वस्तू वापराअभावी खराब होण्याची देखील भीती निर्माण झाली आहे. अनेकदा हे कार्यक्रमांसाठी कला मंदिर मिळावे अशी मागणी देखील कलाकारांकडून केली जाते. 

कलाकारांमध्ये प्रचंड नाराजी

महानगरपालिका प्रशासनाकडून हे कला मंदिर बंद अवस्थेत असल्यामुळे कलाकारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पुढच्या महिन्यात या कला मंदिराच्या शुभारंभाला पाच वर्षे पूर्ण होणार आहे मात्र तरी मनपा प्रशासनाने उपाययोजना करून नाट्यगृह नाशिककरांसाठी खुले करावे अशी मागणी आता नाशिककर करत आहे. हे कला मंदिर सुरू झाले तर नाशिकच्या कलाकारांना वाव मिळेल आणि हक्काचे कला मंदिर देखील उपलब्ध होईल त्यासोबत मनपाच्या उत्पादनात देखील भर पडेल. 

महापालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष 

कोटींचा निधी खर्चून कला मंदिर उभे केले असले तरी ते धूळखात अवस्थेत पडून असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. कला मंदिराच्या काचा देखील निखळून पडल्या आहे. कला मंदिराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व बाबींकडे महापालिका प्रशासन मात्र सपशेल दुर्लक्ष करत असल्याचा निदर्शनास येत आहे. नाशिक ही कलाकारांची भूमी असून येथे कलाकारांच्या प्रश्नांना न्याय मिळत नसेल तर तो अपमानच असल्याचे म्हणत नाशिकच्या कलाकारांना भोरे कला मंदिर खुले करावे, अशी मागणी जेष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक सुरेश गायधनी यांनी केली आहे.

कसे आहे कला मंदिर? 

  • सहा एकरात 25 कोटी खर्च करून भव्य कला मंदिर 
  • चार वर्षाच्या आतच कला मंदिराचे बांधकाम पूर्ण 
  • कला मंदिराच्या पश्चिमेला प्रशस्त वाहनतळ 
  • नाट्यगृहात अत्यावश्यक सुखसुविधा 
  • नाट्यगृहाच्या दोन्ही बाजूस प्रसाधनगृह 
  • नाट्यगृहात स्वतंत्र दोन तालीम हॉल 
  • भव्य रंगमंच, सुसज्ज मेकअप रूम
  • दोन मोठे हॉल 
  • अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा 
  • लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या साऊंड सिस्टिम 
  • अत्याधुनिक स्टेज लाईट 
  • स्वयंचलित सरकारी पडदे 
  • मुख्य रंगमंच 15 मीटर×दहा मीटर 
  • प्रेक्षक गृहात 500 आणि बाल्कनीत 150 आरामदायी खुर्च्या 
  • संपूर्ण इमारतीला अग्निशमन यंत्रणा 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले १९ पुरावे, बोटांचे ठसे आरोपींना नेणार शिक्षेपर्यंतABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 27 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सUddhav Thackeray : हिंदू - मुस्लिमांमध्ये भांडणं लावणाऱ्या भाजपने सांगावं की हिंदूत्ववाद सोडला...Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
बायको आजारी असल्याचे म्हणाली, नवऱ्याला शंका येताच मागून गेला अन् थेट प्रियकराच्या कारमध्ये दिसली; रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न करताच
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतरही  भारतीय शेअर बाजारात तेजी, चार कारणांमुळं सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या घोषणेनंतरही शेअर बाजाराची दमदार वाटचाल, सेन्सेक्समध्ये मोठी वाढ
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारी कार्यालयात पैशांची उधळण; 500 च्या नव्याकोऱ्या खोट्या नोटांचे बंडल
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांनाच एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
Santosh Deshmukh Case: काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् तो साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
काळ्या रंगाची स्कॉर्पिओ अन् 'तो' साक्षीदार ठरणार गेमचेंजर, संतोष देशमुख प्रकरणात महत्त्वाची अपडेट
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Embed widget