एक्स्प्लोर

MNS Vardhapan Din : लढायचं ते जिंकण्यासाठीच! वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नाशिकमधील होर्डिंग्स चर्चेत

Raj Thackeray : मनसेचा 18 व्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा नाशिकमध्ये पार पडणार आहे. यानिमित्त नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.  

Nashik News नाशिक : मनसेचा 18 व्या वर्धापन दिनाचा (MNS Vardhapan Din) सोहळा यंदा नाशिकमध्ये (Nashik) पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. यानिमित्त नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 7 मार्चला नाशिक शहरात येणार असून 9 तारखेला दादासाहेब गायकवाड सभागृहात वर्धापन दिना निमित्ताने त्यांची तोफ धडाडणार आहे. कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) रणशिंग ते नाशिकमधून फुंकणार असून भाषणात ठाकरे नक्की काय बोलणार? महायुती सोबत जाण्याची ते काही घोषणा करणार की स्वबळाचा नारा देणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेले आहे.  

लढायचं ते जिंकण्यासाठीच..

तर दुसरीकडे मनसेच्या वतीने शहरभर लावलेल्या होर्डिंग्सवरील 'लढायचं ते जिंकण्यासाठीच' हा मजकूर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. होर्डिंग्सवर लढण्याची हिंमत ठेवणार संपत नसतो! लढायचं ते जिंकण्यासाठीच.. 18 वा वर्धापन दिन असा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात या होर्डिंग्सची जोरदार चर्चा सुरु आहे. 

नाशिक होणार मनसेमय

नाशिकमध्ये मनसेचे दि. 07, 08 आणि 09 मार्चला भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. सात मार्चला पक्षाचे प्रमुख राज ठाकरे नाशिकमध्ये येतील. आठ मार्चला सकाळी मनसेत काही प्रवेश होतील. त्यानंतर नऊ मार्चला मनसेच्या वर्धापनदिनी दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाचा राज्यव्यापी मेळावा होईल. पक्षाचे राज्यभरातील प्रमुख नेते मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. 

मनसे फुंकणार नाशिकमधून निवडणुकीचे रणशिंग

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले आहेत. एकेकाळी नाशिकची मनसेचा बालेकिल्ला अशी ओळख होती. आता पुन्हा नाशिकवर कब्जा करण्यासाठी मनसेने लक्ष केले असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग नाशिकमधून फुंकण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला आहे. 

राज ठाकरे घेणार प्रभू श्रीरामाचे दर्शन

जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काळारामाचे दर्शन घेतले होते. तर 22 जानेवारीला अयोध्येला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काळारामासमोर नतमस्तक झाले होते. आता राज ठाकरे (Raj Thackeray) देखील काळाराम मंदिराचे (Kalaram Mandir) दर्शन घेणार आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Pune Raj Thackeray : बैठक बोलवली पण पदाधिकारीच उशिरा आले; राज ठाकरे तडकाफडकी माघारी परतले; पुण्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी : पुणे, कोल्हापूर ते संभाजीनगर, बुलढाणा, राज ठाकरेंच्या मनसेकडून 21 मतदारसंघाचा आढावा, कुठे कुठे उमेदवार देणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget