एक्स्प्लोर

Goda Aarti : गोदा आरतीवरून नाशकात पुन्हा वादावादी, पुरोहित संघ आक्रमक, नेमकं कारण काय?

Goda Aarti Nashik : गोदा आरतीवरून नाशकात रामतीर्थ सेवा समिती आणि पुरोहित संघात पुन्हा वाद झाला असून पुरोहित संघ आक्रमक झाल्याचे दिसून आले.

नाशिक : गोदा आरतीवरून (Goda Aarti) नाशकात रामतीर्थ सेवा समिती (Ramtirth Seva Samiti) आणि पुरोहित संघात (Purohit Sangh) पुन्हा वाद झाला आहे. रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने गोदा घाटावर होणाऱ्या बांधकामाविरोधात पुरोहित संघाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलीस आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाची झाल्याचेही दिसून आले. 

फेरुवारीमध्ये पुरोहित संघ (Purohit Sangh) आणि रामतीर्थ समिती यांच्यात गोदावरीची आरती कोणी करावी यावरून वाद सुरू झाला होता. हा वाद मिटला नसल्याने पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी समिती दोघांनी वेगवेगळी आरती करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून रामकुंड (Ramkund) परिसरात गोदावरीच्या (Godavari River) दोन स्वतंत्र आरत्या होत आहेत. त्यातच आता रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने गोदा घाटावर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विरोधात पुरोहित संघ चांगलाच आक्रमक झाल्याचे दिसून आले. 

पुरोहित संघाकडून ठिय्या आंदोलन 

पुरोहित संघाकडून गोदावरी नदीच्या रामकुंड परिसरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलीस (Police) आणि पुरोगामी संघात शाब्दिक बाचाबाची झाली. सध्या रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने दररोज शासकीय गोदावरी आरती सुरु आहे. याच आरतीसाठी नदीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाला पुरोहित संघाने कडाडून विरोध केला आहे.  

पंचवटी परिसरात तणावाचे वातावरण 

बांधकामाला विरोध दर्शवत पुरोहित संघाने हे बांधकाम करू नये, बांधकाम करायचं असेल तर आमच्या डोक्यात येथे दगड घालून आम्हाला या ठिकाणी बळी द्या, आम्ही हुतात्मा स्वीकारायला तयार आहोत, अशी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या रामकुंड येथे पंचवटी पोलीस दाखल झाले असून परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

गोदा आरतीसाठी 11 कोटींचा निधी

दरम्यान, वाराणसी, हृषिकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरतीप्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखील कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मांडली होती. या 'गोदा आरती' उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून 11 कोटी 77 लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला आहे. 

आणखी वाचा 

नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, लासलगावमध्ये करणार एल्गार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, लासलगावमध्ये करणार एल्गार
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
Ashok Kharat Crime News: चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?
चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Embed widget