राज्याच्या रामभूमीत भाजप फोडणार प्रचाराचा नारळ, राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
नाशिक : अयोद्धेतील (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) नाशिक दौऱ्यावर (Nashik News) येणार आहेत. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येण्याची शक्यता आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळावाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या महोत्सवाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आली आहे. मोदींच्या दौऱ्या निमित्ताने प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. राष्ट्रीय युवक मेळावासाठी जागेचा शोध सुरू आहे. या युवक मेळाव्यासाठी राज्यभरातून अनेक युवक येण्याची शक्यता आहे.
कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा आणि होणारी गर्दी लक्षात घेऊन जागेचा शोध सुरू आहे. केंद्रीय पथक नाशिकमधे येऊन करणार जागेची चाचपणी करणार आहे. राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही उपस्थित राहणार आहे. काँग्रेसच्या नागपूरमधील "हैं तैयार हम" महारॅलीला मोदी नाशिकमधून उत्तर देणार आहे. नाशिकच्या सभेतून भाजप राज्यातील लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे.
रामाच्या भूमीतून भाजप प्रचाराचा नारळ फोडणार
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने विशेष रणनीती आखली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील 45 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढवल्या जाणार आहेत. त्यासाठी आतापासूनच धार्मिक वातावरण निर्मिती केली जात आहे.त्यामुळे राज्यात रामाच्या भूमीतूनच भाजप प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन असून त्यासाठीच नाशिकची निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार असून ते फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार आहेत. लवकरच या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर होईल. महायुतीच्या आमदार आणि खासदारांसोबत फडणवीस प्रचार करणार आहेत. केंद्रात नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याचाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश नंतर मोठे राज्य असलेल्या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यापैकी महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे.
हे ही वाचा :