(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PM Modi Oath Taking Ceremony : मोदींच्या शपथविधी सोहळ्याला नाशिकचे व्हिसलमॅन चंद्रकिशोर पाटलांना निमंत्रण; म्हणाले...
PM Modi Oath Taking Ceremony : नाशिकचे व्हिसलमॅन म्हणून ओळख असेलेले चंद्रकिशोर पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
PM Modi Oath Taking Ceremony : नाशिककरांसाठी अभिमानास्पद बातमी आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी नाशिकचे व्हिसलमॅन म्हणून ओळख असेलेले चंद्रकिशोर पाटील (Chadrakishore Patil) यांनी नरेंद्र मोदींच्या शपथविधी (PM Modi Oath Ceremony) सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
चंद्रकिशोर पाटील म्हणाले की, अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्या कार्यालयातून मला फोन आला आहे. त्यांनी सांगितले की सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचायचे आहे. यामुळे खूपच आनंद झालेला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. मी नाशिकमध्ये नदी स्वच्छतेचे काम करतो. त्या कामाचा आढावा नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात घेतला आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देखील आम्हाला बोलावण्यात आले होते. आता शपथ विधीला बोलावण्यात आले आहे. हा आनंद वेगळाच आहे. माझ्या कामाला पोचपावती दिल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
कोण आहेत चंद्रकिशोर पाटील?
चंद्रकिशोर पाटील हे नाशिकच्या नंदिनी नदीजवळ वास्तव्यास आहेत. नंदिनी नदी स्वच्छ राहावी, यासाठी चंद्रकिशोर पाटील जनजागृती करतात. ते स्वतः नंदिनी नदी स्वच्छ करतात. याशिवाय गोदावरी नदी आणि नाशिक शहराच्या स्वच्छतेसाठी जनजागृती करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. दिल्ली येथे त्यांना बोलावून त्यांचा सन्मान केला गेला आहे. आता त्यांना नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या