एक्स्प्लोर

पंकजा मुंडेंनी नाशिक लोकसभेबाबत वक्तव्य घेतलं मागे, म्हणाल्या, नासमझ लोकांनी वेगळाच अर्थ लावला; मनातली सल बोलून दाखवत कोणावर साधला निशाणा?

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बीडमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये बोलताना त्यांनी प्रीतम मुंडे यांना मी नाशिकमधून उभा करेल असं म्हटलं होतं.

Pankaja Munde : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीत (Mahayuti) अजूनही उमेदवार ठरलेला नाही. त्यातच बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नाशिकच्या जागेवर प्रीतम मुंडेंना (Pritam Munde) उभे करेल, असे म्हटले होते. यावरून महायुतीत मोठी खळबळ उडाली होती. आता पंकजा मुंडे यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. 

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दररोज नवनवीन उमेदवारांची नावे समोर येत आहेत. हेमंत गोडसे (Hemant Godse), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अजय बोरस्ते (Ajay Boraste), राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांच्या नावानंतर प्रीतम मुंडे यांचे नाव अचानक चर्चेत आले. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना टोलाही लगावला होता. 

काही नासमझ लोकांनी वेगळा अर्थ काढला : पंकजा मुंडे 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बीडमध्ये (Beed Lok Sabha Consituency) जाहीर सभा घेतली होती आणि या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मी नाशिकमधून उभा करेल असं म्हटलं होतं. मात्र प्रीतम मुंडे यांना नाशिक मधून उभा करणार हे मी सहज बोलून गेले. काही नासमझ लोकांनी याचा वेगळा अर्थ काढला. नाशिक हे प्रीतम मुंडे यांचे सासर आहे. त्यांना सासरला पाठवता येईल, अशा आशयाने मी बोलेले. मात्र काही लोकांचे स्वागताचे मेसेज देखील आले, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ? 

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळ म्हणाले होते की, पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. नाशिकमध्ये तिन्ही पक्षात खूप उमेदवार आहेत, त्यामुळे त्यांनी बीडमध्ये लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला होता. यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीच्या दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपल्याचे दिसून आले होते. आता पंकजा मुंडे यांचे वक्तव्य छगन भुजबळांना प्रत्युत्तर आहे का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महायुतीत नाशिकचा तिढा कायम असतानाच शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार अजय बोरस्ते शांतीगिरी महाराजांच्या भेटीला, नेमकी काय झाली चर्चा?

नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट, महायुतीच्या तिढ्यात महंत अनिकेत शास्त्रींची उडी, भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jaya Bachchan Rajya sabaha Video : राज्यसभेत खडाजंगी! जया बच्चन भयानक संतापल्या..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 13 February 2025Rajan Salvi On Eknath Shinde : शिवसेनाप्रवेशापूर्वी ठाण्यात भेट,शिंदेंनी साळवींना काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 13 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करताच मातोश्रीचं मोठं पाऊल, आदित्य ठाकरे दिल्लीत गुपचूप राहुल गांधींना भेटले
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
आलिशान कार, लक्झरी व्होल्वो बसेस, आलिशान बंगल्याचा मालक; आदल्या दिवशी संपत्ती जप्त अन् दुसऱ्याच दिवशी भीषण अपघातात अंत; अंत्ययात्रेत हजारोंचा जनसमूदाय
Solapur Crime: सोलापूरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची बदली झाली, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
सोलापूरच्या बार्शीत पोलीस कॉन्स्टेबलचं धक्कादायक पाऊल, टोकाचा निर्णय घेऊन आयुष्य संपवलं
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
लग्नात बिबट्या घुसला अन् वधू वरानं धूम ठोकली; कॅमेरामन झाला 'स्पायडरमॅन'; पंगतीमधील लोकं ताट सोडून दिसेल त्या मार्गाने फरार
Eknath Shinde & Sanjay Dina Patil: एकनाथ शिंदेच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटलांची हजेरी, चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटलांची हजेरी, चर्चांना उधाण
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
साहित्य महामंडळाला अंधारात ठेवून एकनाथ शिंदेंच्या सत्काराचा कार्यक्रम, नियम धाब्यावर बसवले? आयोजक संजय नहार म्हणाले...
Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! जेष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
IPO Update :हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा  8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा 8750 कोटींचा आयपीओ येणार, किंमतपट्टा किती? GMP कितीवर पोहोचला?
Embed widget