Onion Auction : अखेर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरु, सरासरी मिळतोय 'इतका' भाव
Onion Auction : लेव्हीप्रश्र्नी व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे मागील आठ दिवसांपासून कांद्याचे लिलाव ठप्प झालेले होते. आज अखेर लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाले.
Lasalgaon Bajar Samiti लासलगाव : लेव्हीप्रश्र्नी (Lavy) व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे मागील आठ दिवसांपासून कांद्याचे लिलाव (Onion Auction) ठप्प झालेले होते. आज अखेर लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Bajar Samiti) लिलाव सुरू झाले. स्थानिक बाजार समितीतील व्यापारी यांनी लिलावात सहभाग घेतला नाही मात्र नवीन परवानेधारक व विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी यांनी लिलावात सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले.
लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून हमाली मापारी प्रश्नी लिलाव प्रक्रिया बंद होती. लेव्हीप्रश्र्नी व्यापारी व माथाडी मंडळ यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे कांद्याचे लिलाव ठप्प झालेले होते. आज अखेर लासलगाव बाजार समितीचे लिलाव सुरू झाले.
उन्हाळ कांद्याला मिळाला 'इतका' भाव
मात्र या लिलावात स्थानिक बाजार समितीतील व्यापारी यांनी सहभाग घेतला नाही. मात्र नवीन परवानेधारक व विंचूर उपबाजार समितीतील व्यापारी यांनी लिलावात सहभाग घेत कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू केले. उन्हाळ कांद्याला सरासरी 1 हजार 500 रुपये भाव आज बाजार समितीत मिळाला. तर जास्तीत जास्त २९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
दरम्यान, लेव्ही प्रश्नांवरून माथाडी मंडळ व व्यापारी यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) लासलगावसह १५ बाजार समित्यांमधील कांद्यासह शेतमाल लिलाव प्रक्रिया मागील आठ दिवसांपासून बंद आहे. या वादामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, माथाडी मंडळ व व्यापारी यांच्यात लेव्ही प्रश्नांसंदर्भात दोन ते तीन बैठका झाल्या मात्र व्यापारी व माथाडी मंडळ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तोडगा निघाला नाही. परिणामी बाजार समित्या बंदच होत्या. जिल्हा निबंधकांनी व्यापारी लिलावात (Auction) सहभागी होत नसतील तर त्यांचे परवाने रद्द करा, बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांनी दिलेल्या सुविधा बंद करा असे आदेश काल लासलगाव येथील संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्याने लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Bajar Samiti) कांदा लिलाव आजपासून सुरू करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही सरकारनं कांदा निर्यातबंदी का केली? नेमकी काय आहेत कारणं?
कांदा निर्यातबंदीवर हुडी घालून रात्रभर फिरणारे नेते बोलणार का? रोहित पवारांचा बाण एक, वार मात्र तीन