एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : ' नाशिकच्या जागेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार', अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम, महायुतीत तिढा वाढणार?

Nashik Lok Sabha : अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याने आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकच्या जागेसाठी लढू, असे म्हटले. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना शिंदे गटाने राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करून तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti Seat Sharing) अजूनही उमेदवार ठरलेला नाही. मंत्री छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) माघारीनंतर नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाला (Shiv Sena Shinde Faction) सुटेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील (NCP Ajit Pawar Faction) नेत्याने आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकच्या जागेसाठी लढू, असे म्हटले आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावत होते. त्यातच त्यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीत नाशिकची जागेवर चर्चा करण्यात आली. नाशिकमधून हेमंत गोडसेंनाच उमेदवारी मिळणार, असे जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. मात्र अजूनही नाशिकच्या जागेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा सोडलेला नाही. 

भुजबळांनी माघार घेतली तरी नाशिकवर दावा कायम 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे (Anand Paranjpe) म्हणाले की, राष्ट्रवादीने नाशिकचा आपला दावा सोडलेला नाही. छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी आमचा दावा कायम आहे. शिरुरचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील हे 25 तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरतील. यासाठी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर डेक्कनजवळच्या नदी पात्रात मोकळ्या जागेवर सभा देखील होणार आहे.

आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकच्या जागेसाठी लढणार

2009 पासून ते 2014 पर्यंत नाशिकमध्ये घडाळ्याच्या चिन्हावर आमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे नाशिकवर आमचा दावा कायम आहे. साताऱ्याची जागा आम्ही दिलेली आहे. त्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत नाशिकच्या जागेसाठी लढणार आहेत. इतर लोक जागा मागत असतील, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र आम्ही दावा सोडलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आता नाशिकच्या जागेचा तिढा महायुतीत आणखी वाढणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच नाशिकमधून शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप नक्की कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा 

Nashik Lok Sabha : हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? छगन भुजबळ हसत हसत म्हणतात, 'त्यांनी गोड बातमी द्यावी'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Meet CM Devendra Fadnavis : प्राजक्ता माळीनं घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेटNavi Mumbai Airport :  काय आहेत नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये ?Ethiopian Airlines Accidents : इथिओपियात विमान दुर्घटनाग्रस्त, 157 ठारABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 29 December 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh : ना बुमराह, ना हार्दिक पांड्या, ICC चा मोठा निर्णय,टी 20 प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारासाठी अर्शदीपला मानांकन
टी 20 प्लेअर ऑफ द इयरसाठी बुमराह, हार्दिक पांड्या यांना मानांकन न देता अर्शदीपचं नाव, सर्वजण थक्क
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
मालाडमध्ये धक्कादायक घटना, मदरशातच 11 वर्षीय मुलाने संपवलं जीवन, मालवणी पोलिसांचा तपास सुरु
WTC 2025 Final:दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत कितव्या स्थानी?   
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
ना भारत, ना ऑस्ट्रेलिया, अशी एक शक्यता तिसराच संघ WTC फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार? जाणून घ्या समीकरण
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Embed widget