सप्तशृंगीचा उदो उदो! आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ, देवीच्या आभूषणांची भव्य मिरवणूक
'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते', आई राजा उदो उदो अशा जयघोषात नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गड भाविकांच्या गर्दीने दणाणून गेला आहे.
नाशिक: साडेतीन शक्तीपीठांपैकी (Navratri 2023) अर्धशक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील सप्तशृंगी देवी मंदिरात आजपासून शारदीय नवरत्न नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. आज पहाटेच्या सुमारास देवीच्या आभूषणाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्याच बरोबर मंदिरात विधिवत पूजा करून घटस्थापना देखील करण्यात आली. यावेळी हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते', आई राजा उदो उदो अशा जयघोषात नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी गड भाविकांच्या गर्दीने दणाणून गेला आहे. आज सकाळी सात वाजता देवीच्या आभूषणांची पूजा करून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात नेऊन नाशिकचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा संस्थानचे विश्वस्त बी व्ही वाघ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पंचामृत महापूजा झाल्यानंतर घटस्थापना कार्यक्रम जगमलानी यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी धार्मिक कार्यातील पूजे दरम्यान सप्तशृंगी देवी विश्वस्त मंडळासह पोलीस अधीक्षक शहाजी उमाप उपस्थित राहणार आहेत.
साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर आज 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होत आहे. यासाठी काल सायंकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. दर्शनासह घटस्थापनेसाठी लागणारी अखंड ज्योत आणण्यासाठी हजारो नवरात्र मित्र मंडळ गडावरून गावोगावी ज्योत नेली जात आहे. आज शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सात वाजता ट्रस्टच्या मुख्य कार्यालय ते मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश हे सकाळी सात वाजता देवीची पंचामृत महापूजा व महापूजा संपन्न झाल्यावर आरती करणार आली. नवरात्रोत्सवादरम्यान देवी मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार असून, यादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सकाळी पंचामृत महापूजा, दुपार महान आरती व सायंकाळी सांज आरती या तीनही वेळेत भगवत आरती असल्याची माहिती सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
आजपासून सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना बंदी
नाशिक जिल्हयातील श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गडावर आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव कालावधीत सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची फार मोठया प्रमाणावर गर्दी होते. गडावरील रस्ता घाटातुन जात असून वळणा वळणाचा व अरुंद असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांच्या व भाविकांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीची कोंडी होवु नये, म्हणून आजपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत टॅक्सी, ऑटोरिक्षा व सर्व प्रकारच्या खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
हे ही वाचा :