PM Narendra Modi Nashik Visit : मोठी बातमी! नाशिक जिल्हा 'नो ड्रोन झोन' म्हणून घोषित, प्रशासनाचा निर्णय
Nashik News : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणासाठी नाशिक जिल्हा नो ड्रोन झोन म्हणून घोषित केला आहे.

PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाच्या आयोजनाचा मान नाशिकला (Nashik News) मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते तपोवन येथील मोदी मैदानावर शुक्रवारी या सोहळ्याचे आयोजन होणार आहे. या महोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान मोदी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहे. तसेच रामकुंड परिसराची देखील ते पाहणी करतील. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या कारणासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
नाशिक जिल्हा 'नो ड्रोन झोन' म्हणून घोषित (Nashik District declared as 'No Drone Zone')
नाशिक जिल्हा 'नो ड्रोन झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नाशिक जिल्हा 'नो ड्रोन झोन' करण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. 10 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये रोड शो (PM Narendra Modi Road Show in Nashik)
पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल झाल्यावर हेलिपॅडपासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत ते रोड शो करणार आहेत. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोदी यांचा रोड शो होणार आहे. रस्त्याच्या एका बाजूने रोड शो होईल तर दुसऱ्या बाजूने संस्कृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मोदींच्या रोड शोला सुमारे एक ते दीड लाख लोकं उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
पंतप्रधान मोदी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. जवळपास 23 मिनिटं ते मंदिरात असणार असून विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. मोदी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश करतील आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतील. त्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल, भावार्थ रामायणाचा पाठ केला जाईल आणि रामरक्षा पठण होईल, अशी माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
National Youth Festival : पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, नाशिकचा राष्ट्रीय युवा महोत्सव नेमका काय?
मोठी बातमी! भरत गोगावलेंचाच व्हीप ठाकरे गटाला लागू होणार, विधानसभा अध्यक्षांची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
