एक्स्प्लोर

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी थांबवली, नेमकं कारण काय?

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतल्याने थोड्यावेळासाठी थांबवण्यात आली.

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. 30 टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे. आता मतमोजणी प्रक्रिया थोड्यावेळाकरीता थांबवण्यात आली आहे. 

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teachers Constituency Election 2024) एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. प्राथमिक फेरीत 64 हजार 848 मतपत्रिका अपेक्षित होत्या. मात्र एका मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर खळबळ उडाली आहे. 

नेमकं कारण काय? 

मतदान टेबलवर मतदानपत्रिका लावताना तीन मतपत्रिका जास्त निघाल्या आहेत. टेबलवर मतपत्रिका लावताना हिशोबापेक्षा तीन मतपत्रिका जास्त निघाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. जास्त मतपत्रिका निघालेल्या टेबलवर पुन्हा एकदा मतपत्रिका मोजण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

तीन मतपत्रिका अधिक कशा आल्या?

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, चोपडा तालुक्यातील एका मतदान केंद्रावर 3 मत पत्रिका जास्त आढळल्या आहेत.मतमोजणी कक्षातील 22 नंबरच्या टेबलवर मोजण्यात आलेल्या टेबलवर मतपत्रिका जास्त आढळून आल्यात. 3 मतपत्रिका जास्त कशा आल्यात? याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी. मटपेट्या सील करताना अधिकाऱ्यांच्या सह्या असतात. त्यामुळे 3 मतपत्रिका जास्त आल्यानं आम्हाला संशय आहे. ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत हे मतदान केंद्र येते त्याच्यावर कारवाई करा. मतपत्रिका नंतर टाकण्यात आल्यात का? याचा तपास करा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. 

मतमोजणी प्रक्रिया कशी? 

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार आहे. मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Teachers Constituency Election 2024 : मी शपथ घेतो की...! निकालाआधीच झळकले विवेक कोल्हेंच्या विजयाचे बॅनर

Nashik Teachers Constituency Election 2024 : शिक्षक मतदारांना भेटवस्तू अन् पैसे वाटप? आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका, नेमकं काय म्हणाले दिक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य?
समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका, नेमकं काय म्हणाले दिक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य?
Team India: टीम इंडिया मायदेशी कधी दाखल होणार?; अखेर तारीख, ठिकाण अन् वेळ ठरली!
टीम इंडिया मायदेशी कधी दाखल होणार?; अखेर तारीख, ठिकाण अन् वेळ ठरली!
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pregnancy Food Sangli : सांगलीतील पलूसमध्ये गरोदर माता पोषण आहारात मृत सापABP Majha Headlines :  9:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 03 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका, नेमकं काय म्हणाले दिक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य?
समाजमाध्यमावर खोट्या अफवा, त्यातून आंदोलनाचा भडका, नेमकं काय म्हणाले दिक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य?
Team India: टीम इंडिया मायदेशी कधी दाखल होणार?; अखेर तारीख, ठिकाण अन् वेळ ठरली!
टीम इंडिया मायदेशी कधी दाखल होणार?; अखेर तारीख, ठिकाण अन् वेळ ठरली!
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Solapur Crime: 15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हाप्रमुखाची ठेकेदाराला धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल
15 टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे, शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हाप्रमुखाची ठेकेदाराला धमकी, खंडणीचा गुन्हा दाखल
Embed widget