एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशकात 24 तासात 80 मिमी पावसाची नोंद, नांदूरमध्यमेश्वरमधून 36 हजार क्युसेकने विसर्ग, पाच ते सात गावांचा संपर्क तुटला

Nashik Rain Update : शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात शहरासह इतर भागात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Nashik Rain Update नाशिक : शहरासह जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. गेल्या 24 तासात शहरासह इतर भागात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील पाच धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून 36 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु असून पाच ते सात गावांचा संपर्क तुटला आहे. 

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. रामकुंडावरील (Ramkund) अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकाने हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

नांदूरमध्यमेश्वर धरणातून 36 हजार क्युसेकने विसर्ग

नाशिक जिल्ह्यातील दारणा, भावली, कडवा, पालखेड या धरणातून सरासरी 15 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, सर्वाधिक पाण्याचा विसर्ग नांदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar Dam) धरणातून सुरू आहे. 36 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नांदूरममध्यमेश्वर धरणातून सुरू आहे. त्यामुळे नांदूरसह इतर पाच ते सात गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

नाशिकला आज ऑरेंज अलर्ट

दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे, तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. 

सुरगाण्यात धुव्वाधार पाऊस

सुरगाणा (Surgana) येथे शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला असल्याने नार, पार, मान, तान आणि अंबिका नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी सांडवा पूल पाण्याखाली गेले. तर काही ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. 

त्र्यंबकला मुसळधार पाऊस, गंगासागर तलाव भरला

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे संततधार सुरू असल्याने गंगासागर तलाव भरून ओसंडत आहे. तर परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. येथील अहिल्या, अंबोली, बेझे धरण भरल्याने जादा पाणी गंगापूर धरणाकडे प्रवाहित झाले आहे. त्यामुळे गंगापूर धरणाची पाणीपातळी वाढल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा

Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज कसं असेल हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप
Nashik Crime News: पती नामांकित मनोविकारतज्ज्ञ पण पत्नीच्या मनाचा थांग लागला नाही, नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
पती नामांकित मनोविकारतज्ज्ञ पण पत्नीच्या मनाचा थांग लागला नाही, नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Nashik Bribe News: 1 कोटी 25 लाखांची मागितली लाच, नाशिकमध्ये जीएसटीचे मोठे मासे ACB च्या गळाला; नेमकं प्रकरण काय?
1 कोटी 25 लाखांची मागितली लाच, नाशिकमध्ये जीएसटीचे मोठे मासे ACB च्या गळाला; नेमकं प्रकरण काय?
Nashik Crime News: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरात नायलॉन दोरीने घेतला गळफास; नाशिकमध्ये खळबळ
प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, राहत्या घरात नायलॉन दोरीने घेतला गळफास; नाशिकमध्ये खळबळ

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget