एक्स्प्लोर

दिंडोरीच्या अंडरपास, उड्डाण पूल कामास तत्वत: मंजूरी; 115 कोटींच्या निधीची तरतूद : डॉ. भारती पवार

Maharashtra News : नाशिकमधील दिंडोरीच्या अंडरपास आणि उड्डाण पूलाच्या कामास तत्वत: मंजूरी देण्यात आली असून 115 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचं राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं.

Maharashtra News : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) दिंडोरी (Dindori) येथे राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाण पूल आणि अंडरपासच्या कामास तत्वत: मान्यता दिली असून त्यासाठी 115 कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) नाशिक विभागाची बैठक केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांच्या नाशिक येथील कार्यालयात संपन्न झाली. याबैठकीस आमदार डॉ. राहुल आहेर, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, व्यवस्थापक दिलीप पाटील, आयएसटीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण मोहन यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

चांदवड येथील टी जंक्शन, रेणुका देवी मंदिरात येणाऱ्या भक्तांना पादचारी मार्ग, मनमाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या, मुंबई-आग्रा महामार्गावरील वर्दळीचे ठिकाणे त्याचप्रमाणे जऊळके, वणी आणि चांदवड येथील अपघात प्रवणक्षेत्र याबाबींची गांभीर्याने दखल घेत या ठिकाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या ठिकाणी उड्डाण पूल व अंडरपास होण्यासाठी डॉ. पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही कामे लवकर सुरु करण्यात यावीत आणि कामे दर्जेदार व गुणवत्‍तापूर्ण होतील यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 

नाशिक विभागास 2022-23 या वर्षाकरिता रस्ते आणि पुलाच्या कामांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी दिंडोरी येथील चांदवड जंक्शन 59.42 कोटी तर जऊळके वणी येथे उड्डाण पूल आणि अंडरपाससाठी 55.52 कोटी निधीची तरतूद करण्यात आहे, अशी माहिती यावेळी विभागाचे प्रकल्प संचालक श्री साळुंखे यांनी दिली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik News : काळा पैसा गेला कुठे? नाशिकमध्ये युवक राष्ट्रवादीकडून नोटबंदीला श्रद्धांजली, 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime Jail Gang war: बीड कारागृह मारहाण प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव वगळलं, चर्चांना उधाण
बीडच्या जेलमधील मारहाणीनंतर कारागृह प्रशासनावर संशयाच्या भोवऱ्यात, वाल्मिक कराडचं नाव वगळलं
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 02 April 2025Kunal Kamra Special Report : कामराची कॉमडी, प्रेक्षकांना समन्स; पोलीस नोंदवणार प्रेक्षकांचे जबाबSuresh Dhas Full PC : कृषी केंद्राची कंत्राट अप्रत्यक्षपणे कृषी अधिकाऱ्यांकडेच : सुरेश धसSpecial Report Sanjay Raut : मोदींची सप्टेंबरमध्ये निवृत्ती,राऊतांची भविष्यवाणी;भाजप जाळ्यात अडकणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime Jail Gang war: बीड कारागृह मारहाण प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडचं नाव वगळलं, चर्चांना उधाण
बीडच्या जेलमधील मारहाणीनंतर कारागृह प्रशासनावर संशयाच्या भोवऱ्यात, वाल्मिक कराडचं नाव वगळलं
Indurani Jakhar  : इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवलीहून बदलीचे आदेश
Akola : 'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
'नाफेड'च्या सोयाबीन खरेदीत 1297 क्विंटलचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
नाद खुळा... कंपनीने टार्गेट पूर्ण केलं, मालकाने कर्मचाऱ्यांना SUV कार गिफ्ट दिल्या, 200 कोटींचं जंगी सेलिब्रेशन
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
मोठी बातमी! राज्यात ई-बाईक धोरण, पुणे-छत्रपती संभाजीनगर हायवेवर टोल, मंत्रिमंडळ बैठकीतील 12 निर्णय
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शेतकऱ्याकडून 2 लाख 20 हजारांची लाच; तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात अडकला, तलाठी धूम पळाला
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शाकाहाराचा अट्टाहास! अनंत अंबानींनी कत्तलाखान्यात जाणाऱ्या 250 कोंबड्या दुप्पट पैसा देऊन विकत घेतल्या
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
शिवसेनेला दे धक्का! विधानसभा निवडणुकीत 1 लाखांवर मतं घेतलेल्या उमेदवाराचा उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'
Embed widget