Raj Thackeray LIVE : अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का नाही झालं, पंतप्रधान आले फुलं वाहून गेले; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा
MNS Vardhapan Din : मनसेने नाशिकला अठराव्या वर्धापन दिनाचा मान दिला आहे. या माध्यमातून मनसे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. वर्धापन दिनाचे प्रत्येक अपडेट मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
MNS Vardhapan Din : मनसेने नाशिकला अठराव्या वर्धापन दिनाचा मान दिला आहे. या माध्यमातून मनसे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. वर्धापन दिनाचे प्रत्येक अपडेट मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Raj Thackeray LIVE : मनसे सुरू करते त्याचा शेवट ही करते, राज ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा
अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक अजून का नाही झाले, पंतप्रधान आले फुलं वाहून गेले, काय झालं त्या फुलांचं. मनसे सुरू करते तसा शेवट ही करते. आमची भूमिका स्वच्छ प्रामाणिक होती आहे. प्रार्थना स्थळावरील भोंगे काढले, आंदोलन यशस्वी केलं, असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Raj Thackeray LIVE : माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलन केलं, लाठ्या काठ्या खाल्ल्या, केस घेतल्या : राज ठाकरे
Raj Thackeray LIVE in Nashik : नशीब महाराजाच्या वेळी सोशल मीडिया नव्हता, नशीब नाहीतर गनिमीकावा कसा करतात, हे विचारले असतं. मला भरपूर गोष्टी बोलायचे आहे तर गुढीपाडवा शिवतीर्थवर. माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलन केलं. लाठ्या काठ्या खाल्ल्या. केस घेतल्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
Raj Thackeray LIVE : माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद आहे : राज ठाकरे
राज ठाकरे काय म्हणाले? Raj Thackeray speech Nashik LIVE
सोशल मीडियावर माझ्या बाबतीत ही काहीतरी दाखवतात, गाडी येते मी उतरतो आणि रारारा गाणं लावतात.
पक्ष म्हटले की लोक बघत नाही. काहीतरी माहिती असेल तरच बघतात. केतन जोशी यांची व्याख्याने जिल्हा तालुका स्तरावर ठेवणार.
मनसे ला 18 वर्ष पूर्ण होत आहे. राज्यातील प्रत्येक प्रमुख शहरात वर्धापनदिन साजरा करण्याचे ठरविले आहे.
आज राजकीय इतिहास सांगणे आवश्यक आहे. आजकाल प्रत्येकाला वडा टाकला की तळून आलेला पाहिजे.
सर्व फास्टफूड पाहिजे. राजकारण मध्ये वावरायचे असेल तर सर्वात महत्वाचे पेंशन्स पाहिजे.
तुमच्या अजीबाजूचे यश आपल्याला आज दिसते नरेंद्र मोदी चे यश तुम्हाला वाटत असेल पण त्याचे 20 टक्के यश असेल पण त्या पक्षा साठी इतके वर्ष झटत आलेखस्ता खाल्ल्या त्याचे यश आहे.
वाजपेयी, अडवाणी,महाजन मुंडे या लोकांची ज्या खस्ता खाल्ल्या हे त्याचे यश आहे अचानक आलेल्या नाही.
अटल जी याचे सरकार 13 दिवस 13 महिने साडेचार वर्षच सरकार आले.
18 वर्षात माझे भाग्य समजतो अनेक चढ उतार चढ कमी उतार जास्त पण तुम्ही माझ्या सोबत राहिला. यश नक्की मिळणार, मि मिळवून देणार पण पेशन्स पाहिजे. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या राज्यात दुसऱ्याची पोरं खेळतात,पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद आहे
Raj Thackeray LIVE Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, निवडून येणाऱ्या माणसाची मोळी - राज ठाकरे
Raj Thackeray in Nashik : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे. शरद पवार हेच करत आलेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार
राज्यात कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर जनसंघ, शिवसेना आणि मनसे हे आहेत.
Raj Thackeray : मनसेला 18 वर्ष पूर्ण, वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे नाशकात
Raj Thackeray in Nashik : राज ठाकरे म्हणाले की, सोशल मीडियावर माझ्या बाबतीत ही काहीतरी दाखवतात, गाडी येते मी उतरतो आणि रारारा गाणं लावतात. पक्ष म्हटले की लोक बघत नाही. काहितरी माहिती असेल तरच बघतात केतन जोशी यांची व्याख्याने जिल्हा तालुका स्तरावर ठेवणार. मनसेला 18 वर्ष पूर्ण होत आहे. राज्यातील प्रत्येक प्रमुख शहरात वर्धापनदिन साजरा करण्याचे ठरविले आहे. आज राजकीय इतिहास सांगणे आवश्यक आहे. आजकाल प्रत्येकाला वडा टाकला की तळून आलेला पाहिजे.