North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
North Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
North Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, उत्तर महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स वाचा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Nashik Crime News : नाशिकमध्ये तीन चोऱ्या अन् घरफोडी; तीन लाखांचा मुद्देमाल लंपास
शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकत्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तीन चोरीच्या व एक घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे ३ लाख ८७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. चोरी आणि घरफोडी रोखण्याचे नाशिक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
Dhule News : 27 जानेवारीला काँग्रेसचे बडे नेते धुळ्यात
आगामी निवडणुका महत्त्वाच्या असून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकांसाठी सज्ज झालो आहोत. आम्ही एकजुटीने या निवडणुका लढू व जिंकू, असा निर्धार आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केला. 27 जानेवारी रोजी धुळ्यात होणाऱ्या नाशिक विभागीय बैठकीत ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या मान्यवरांसह सर्व प्रदेश उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि पाचही जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
Chandanpuri Yatrotsav : चंदनपुरीच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण करीत, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट चा जयघोष करीत आज प्रति जेजुरी म्हणून संबोधल्या गेलेल्या नाशिकच्या मालेगाव येथील चंदनपुरी यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सपत्नीक महापूजा करत वाघ्या मुरळीसह खंडोबाची तळी भरली.
Nashik Crime News : नाशकात तीन चोरीच्या घटना अन् घरफोडी
गेल्या काही दिवसांमध्ये नाशिक शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.शहरात तीन चोरीच्या व एक घरफोडीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सुमारे 3 लाख 87 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik News : 25 अनुकंपाधारकांना मिळणार नियुक्तीचे पत्र
नाशिक जिल्ह्यातील 25 अनुकंपाधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसेंच्या हस्ते देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जवळपास 525 लाभार्थींना गेल्या वर्षभरात लाभ मिळाला आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.