
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या वाचा इथे...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, राजकीय, क्रीडा, सामाजिक, आर्थिक, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी तसेच इतर अपडेट्स मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नाशिकला तोतया पोलिसाने लांबविले वृद्धेचे दागिने
पोलीस असल्याचे खोटे सांगून दोन अज्ञात इसमांनी एका वृद्धेचे सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली. फिर्यादी हेमलता सतीश गोगटे (70, रा. ग्रीन स्क्वेअर सोसायटी, गंगापूर रोड) ही महिला प्रसाद मंगल कार्यालयासमोरून पायी जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन अज्ञात इसमांनी महिलेजवळ जाऊन आपण पोलीस असल्याचे खोटे सांगितले. महिलेचा विश्वास संपादन करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या बांगड्या पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून नजर चुकवून चोरून नेले.
पिंपळगावला अॅक्सिस बँकेची तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक
पिंपळगाव बसवंत येथील अॅक्सिस बँकेच्या शाखेत तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अॅक्सिस बँकेच्याशाखेत बनावट डिमांड ड्राफ्ट भरून त्याचे पैसे काढून घेणारा संशयित आरोपी एस. के. ट्रेडिंगचे संचालक अनिकेत श्रीनिवास मुदंडा याच्याविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नरला एकाच दिवशी तीन घरफोड्या
सिन्नर येथील सरदवाडी रोडवरील शांतीनगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून लाखोंचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घरफोड्यांमध्ये 22 टोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि 70 हजारांची रोकड चोरांनी लंपास केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरणाऱ्या टोळीस बेड्या, सात जणांना अटक
मालेगाव शहरासह सटाणा, चांदवड, येवला, जळगाव व नाशिक शहरातून दुचाकींची चोरी करत विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस यंत्रणेस यश आले आहे. एका चोरट्यास पोलिसांनी सापळा रचून अटक करत त्याच्याकडून 6 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. तसेच या चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या सहा जणांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
