एक्स्प्लोर

Nashik Manmad News : धक्कादायक! केसपेपरवर जातीच्या कॉलमचा उल्लेख, मनमाड रुग्णालयातील प्रकार, नेमकं प्रकरण काय? 

Nashik Manmad News : केसपेपरवर रुग्णाने जातीचा उल्लेख करावा, यासाठी एक कॉलम असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nashik Manmad News : एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र (Maharashtra) म्हणून ओळख असलेल्या राज्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात (Manmad Hospital) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जात विचारली जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शासकीय रुग्णालयातील ‘केस पेपर’वर जातीचा उल्लेख असलेला रकाना तातडीने काढून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.

आजही गोर गरिबांसाठी सरकारी रुग्णालये महत्वाची ठरत असतात. कोणताही उपचार घेण्यासाठी रुग्ण या सरकारे रुग्णालयात धाव घेतात. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालय हे चांदवड (Chandwad), नांदगाव (Nandgaon), येवला (Yeola) या तीनही तालुक्यांना मध्यवर्ती आहे. शहर व परिसरातील आणि 40 खेडय़ांतील रुग्ण या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र मनमाड उप जिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘केस पेपर’वर  जातीचा एक रकाना असून असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. छगन भुजबळ, अजित पवार यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देत घटनाविरोधी असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान राज्यात ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालया मार्फत रुग्णावर मोफत उपचार केले जातात. शासकीय दवाखान्यांमधून उपचारासाठी रुग्ण गेला असता, त्याला प्रथम केसपेपर काढावा लागतो. या केसपेपरमध्ये रुग्णाला स्वतःबद्दलची माहिती भरावी लागते. मात्र आता या केसपेपरवर रुग्णाने त्याच्या जातीचा उल्लेख करावा, यासाठी एक कॉलम असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत अंनिसच्या कार्यकत्यांना आढळून आलेले आहे. रुग्णाला देण्यात येणाऱ्या केसपेपरवर जातीचा उल्लेख दर्शविणारा कॉलम तातडीने काढून टाकण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निवेदनाद्वारे केली आहे. 

तर यावर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना काय त्रास आहे. हे विचारलं पाहिजे, आजाराचा पूर्व इतिहास विचारला पाहिजे, जात विचारल्यानंतर काय वेगळे औषध देणार आहेत का? असा संतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला. जातीचा उपचार कोण करत आहे आणि कोणी करायला सांगितला आहे, हे विचारले पाहिजे असेही ते म्हणाले.

जातीभेदाला खतपाणी घालणारा प्रकार 

नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा, घटनाविरोधी, मानवता विरोधी आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाची जात विचारली जाऊ नये, मनमाड उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात अन्यत्र कुठे असे प्रकार सुरू असतील तर ते तात्काळ थांबवावेत अशी मागणी ही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान मनमाडसह अनेक रुग्णालयात जातीच्या रकाना असण्याची शक्यता आहे. शासनाकडूनच हा फॉरमॅट आला असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच काही समाजातील नागरिकांसाठी शासनाच्या योजना असतात, त्यासाठी जातीचा रकाना टाकण्यात आला असल्याचे देखील समजते. मात्र सरकारी दवाखान्यात सर्दी, खोकला, अपघात इतर साधारण उपचारासाठी नागरिक येत असतात. यासाठी जातीचा रकाना असण्याची आवश्यकता काय? इतर उपचारासाठी नागरिक खासगी रुग्णालयात उपचार घेतात, त्या रुग्णालयात शासकीय योजना असतात. मग तिथे असा प्रकार नसतो.. असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget