एक्स्प्लोर
Advertisement
Nashik News : सुरगाण्यात 'पुष्पा' गॅंग सक्रिय, खास गुटखा बनवण्यासाठी खैर लाकडाची तस्करी
सुरगाणा तालुक्यातील जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड होत असताना वन विभागाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
Nashik News Updates: नाशिकच्या आदिवासी बहुल वन पट्ट्यात 'पुष्पा' गॅंग पुन्हा सक्रिय झाली असून गुटखा तयार करण्यासाठी दुर्मिळ अशा खैराशी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरगाणा तालुक्यातील जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड होत असताना वन विभागाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ सुरगाणा वन पट्ट्यात वन संपदेची तस्करी होत होत असल्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर असलेल्या सुरगाणा या आदिवासी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आहे. अनेक दुर्मिळ झाडे या ठिकाणी आढळतात त्यापैकी खैर एक आहे. कुकडणे आणि गुजरात लगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात खैराची झाडे आहेत. खैराचे अनेक उपयोग आहेत. खैराच्या झाडापासून गुटख्यासाठी लागणारा खैर आणि रसायन भुट्टी बनवण्यात येत असल्याने त्याला जास्त मागणी आहे. नेमके हेच वैशिष्ट्य हे खैर तस्करांनी खैराच्या झाडांकडे आपला मोर्चा वळवला असून रात्रीच्या वेळी जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड करून तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान गेल्या वर्षांपासून खैराच्या लाकडाची तस्करी सुरु आहे. मात्र एखाद्या वेळी संशयित वन कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्याचे दिसून येते. यातच हे संशयित खैराचे झाड कापून झाले की, खोड जाळून पुरावा नष्ट केला जात आहे. विशेष म्हणजे वनविभागाची सुरक्षा रक्षक, कर्मचारी आणि तपासणी केंद्र असतानाही खैराची लाकडे बाहेर कशी जातात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वनविभागाच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांचा आरोप आहे.
खैराचे लाकूड हे गुटखा बनवण्यासाठी उपयोगात येत असल्याने खैराच्या लाकडाला किलोला 38 ते 40 रुपये भाव मिळत आहे. एका झाडापासून दोन ते तीन टन लाकूड मिळते. त्यामुळे लाखोंची किंमत मिळत असल्याने खैराच्या झाडांची तोड केली जात आहे. स्थानिकांनी याबाबत वन विभागाला कळवले, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही दखल घेण्यात येत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच खैराच्या तस्करीचा प्रकार सुरू असल्याचा संशय येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. आता तरी वनविभागाने जागे होऊन उर्वरित खैराची झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान वनविभागाकडून तस्करी रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. अनेकदा वन कर्मचारी मागावर जातात, मात्र हे संशयित कुठे पसार होतात हे लक्षात येत नाही, त्यामुळे पोलिसांसारखा खेळ सुरू राहतो. वन विभागाकडून वाहनांची तपासणी नाक्यावर तपासणी केली जाते. त्या माध्यमातून तस्करीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे अशी माहिती उंबरठाणचे वनाधिकारी कैलास नागरगोजे यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement