Gauri Ganpati 2023 : आली गौराई आली, सोनं पावलांनी आली! नाशिकमध्ये जर्मनीहून आलेल्या गौराईचा राजेशाही थाट, दोन लाखांचा साज
Nashik Gauri Ganpati : नाशिकच्या शहाणे कुटुंबीयांनी थेट जर्मनीहून (Jarmani) महालक्ष्मीच्या मूर्ती मागवल्या असून घरातच राजस्थान पॅलेसची अनोखी प्रतिकृती साकारत महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे.
नाशिक : गणपतीसोबतच (Ganesh Chaturthi) गौरीचेही सोनपावलांनी आगमन झाले असून घरोघरी अतिशय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिकच्या शहाणे कुटुंबीयांनी थेट जर्मनीहून (Jarmani) महालक्ष्मीच्या मूर्ती मागवल्या असून घरातच राजस्थान पॅलेसची अनोखी प्रतिकृती साकारत महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. जवळपास दोन लाख रुपयांचा साज शृंगार या गौरींना चढविण्यात आला आहे. अत्यंत सुंदर, देखणं आणि अनोखं असं रूप या गौराईचं पाहायला मिळतं आहे.
नाशिकच्या (Nashik) शहाणे कुटुंबियांनी आपल्या घरी गौरी-गणपतीची स्थापना केली आहे. विशेष या गौराई महाराष्ट्रात तयार केल्या नसून थेट जर्मनीत महालक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. यंदा शहाणे कुटुंबीयांनी राजस्थान पॅलेसचा (Rajsthan Palace) देखावा साकारला असून त्यात महाराणी सारखा लूक गौराईला देण्यात आला आहे. त्यामुळे त्या विशेष लक्ष वेधून घेत आहेत. नाशिक शहरातील मेनरोड परिसरात वास्तव्य करणारे शहाणे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून गौराईची स्थापना करतात.
मागील दोन वर्षांपासून पश्चिम जर्मनीतील एका कारागिराने चार महिने मेहनत घेत या मूर्ती साकारल्या आहेत. फायबरच्या जरी वाटत असल्या तरी त्या शिवण या भरीव लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत. एका गौरीचे वजन हे जवळपास 80 किलो एवढे असून त्या 100 वर्ष टिकतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या गौराईंचे केस, डोळे, कान, ओठ हे अत्यंत हुबेहूब असे आहेत. लक्ष्मीचे डोळे पाहताच आपल्याला जिवंत देखावा असल्याचा भास होतो.
शहाणे कुटुंबीयांनी राजस्थान पॅलेसचा देखावा उभारला असून त्यानुसार सेट उभारण्यात आला आहे. या कामासाठी जवळपास पाच ते सहा दिवसांचा वेळ लागला आहे. तसेच लक्ष्मीच्या मूर्ती सोडल्या तर सर्व सजावट शहाणे कुटुंबीयांनी केली आहे. लक्ष्मीचा साज शृंगार हा शहाणे कुटुंबीयांनी केला असून मूर्तीवर सोने चांदीचे जवळपास 5 किलोहून अधिक दागिन्यांची आभूषणे असून मंगळसूत्र, राणीहार, कंबरपट्टा अशा प्रत्येक दागिन्यांनी महालक्ष्मी साकारण्यात आल्या आहेत, याला जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे अत्यंत सुंदर, देखणं आणि अनोखं असं रूप या गौराईचं पाहायला मिळतं आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेल्या माहेरवाशिणीच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळतो, अगदी तसाच आनंद या गौरीकडे बघितल्यावर होतो.
राजस्थान पॅलेसचा देखावा
सोनपावलांनी लाडक्या गौरीचे आगमन झाले असून शहाणे कुटुंबीयांनी अतिशय सुंदररित्या देखावा साकारण्यात आला आहे. राजस्थान पॅलेसचा देखावा उभारला असून राणीच्या रुपात गौरी बसविण्यात आली आहेत. तसेच राजस्थान पॅलेसमध्ये जशी सजावट असते, तशी हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लक्ष्मीचा डोक्यावरील टोप हा हॅण्डमेड असून जव्हेरी दागिन्यांचा वापर करण्यात आला आहे. एकूणच गौराईंना राजेशाही लूक देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी :