Nashik News: तब्बल 14 मुलं अन् मुली; संगोपन होईना, दीड महिन्यांच्या बाळाला विकल्याचा संशय, आई-वडिलांकडून मोठा खुलासा, नाशिक पोलिसांचा शोध सुरू
Nashik News: नाशिक ग्रामीण पोलिसांकडून घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी मध्यरात्री तपास सुरू केला आहे, बाळाचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याची वाडी वावीहर्ष पाड्यावर राहणाऱ्या 45 वर्षीय महिलेने तब्बल 14 मुलं मुलींना (14 boys and girls) जन्म दिला. या महिलेने मुलांचे संगोपन होत नाही आर्थिक अडचण आणि मुलांना आजारपणात योग्य उपचार मिळत नाही यामुळे 14 मुला मुलींपैकी (14 boys and girls)सहा मुलं आणि मुली विकल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने उपस्थित केला. या घटनेने एकाच खळबळ उडाली असून पैशांसाठी पोटच्या मुलाला विकल्याचा संशय व्यक्त झाल्याने यंत्रणादेखील खडबडून जागी झाली.(Nashik News)
Nashik News: 45 वर्षीय महिलेला तब्बल 14 मुलं आणि मुली झाल्या
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील टाके देवगाव या आदिवासीबहुल पाड्यावर वावी हर्ष येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला. बच्चुबाई हंडोगे या 45 वर्षीय महिलेला तब्बल 14 मुलं आणि मुली झाल्या. यापैकी सहा हून जास्त मुला मुलींची पैशासाठी विक्री झाल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. 10 ऑक्टोंबर 2025 रोजी या महिलेला एक पुरुष लिंगाचे अपत्य झाले आणि या अपत्याचा वजन कमी असल्याने आरोग्य विभागाकडून या नवजात बाळाचे आरोग्याची तपासणी आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या महिलेच्या घरी सुरू होती. मात्र या महिलेला मुलाचे संगोपन होत नसल्याने ते मूल तिने विकल्याची माहिती अशा सेविकेसह स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. ज्यावेळी या मुलाची आरोग्य तपासणी करण्यासाठी स्थानिक अशा सेविका नेहमीप्रमाणे गेली त्यावेळी तिला या महिलेने तिचे नवजात बाळ विकल्याचा संशय आला आणि या आधीचे देखील दोन ते तीन लहान मुलं आणि मुली विकल्याची माहिती मिळाली. मात्र ज्या आदिवासी पाड्यावर हा संपूर्ण प्रकार घडला त्या ठिकाणी आमची टीम पोहोचली आणि हा प्रकार नेमका काय आहे? तो या अशा सेविकेकडूनच जाणून घेतला.
Nashik News: आरोग्य तपासणी करण्यासाठी बाळ कुठे असे विचारलं तेव्हा...
अशा सेविकेने नेहमीच्या तपासणी दरम्यान या या बाळाच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी बाळ कुठे असे विचारलं तेव्हा ते बाळ देऊन टाकलं असे उत्तर या अशा सेविकेला बाळाच्या आईकडून मिळालं. या आधी देखील दोन ते तीन वेळा अशाच घटना घडल्याने अंगणवाडीच्या अशा सेविकेचा लहान बाळ विकून टाकल्याचा संशय वाढला आणि तात्काळ वरिष्ठांना आशा वर्करने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणात डॉक्टरांकडून देखील घटनेची माहिती मिळताच प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली.
घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना देखील ही माहिती मिळाली. कोणतीही मदत या महिलेला मिळाली नाही आणि आर्थिक अडचणीमुळे बाळाचे संगोपन न झाल्याने जन्म दात्या आईनेच बाळ विकल्याचा संशय व्यक्त करत आरोग्य विभागाच्या अकार्यक्षम कृतीने जन्मदात्या आईवर नवजात बाळाला विकल्याची वेळ आली असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.
Nashik News: पैशासाठी नाही तर....
पैशासाठी मुलाची विक्री केल्याच्या घटनेनंतर एबीपी माझाची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली. यावेळी घटनास्थळावर पोलिसांचे पथक देखील तपास करत होते. संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू असताना बच्चूबाई हंडोगे या महिलेचा देखील एबीपी माझाच्या टीमने शोध घेतला. मात्र पैशासाठी नाही तर हालकीचे जीवन जगत असताना बाळाचे आजारपण आणि त्याला दूध मिळत नसल्याने हे बाळ आम्ही नातेवाईकांना दिले. दत्तक म्हणून हे बाळ आम्ही दिले या आधी देखील आमच्या नातेवाईकांमध्ये बाळ सांभाळण्यासाठी दिल्याचा खुलासा बच्चुबाई हंडोगे आणि विष्णू हंडोगे या दांपत्याने केला.
Nashik News: बाळ दत्तक दिलंय नातेवाईकांना सांभाळण्यासाठी दिल्याचं सांगितले
बाळाला विकले नाही तर नातेवाईकांना दत्तक दिल्याची कबुली या बाळाच्या आई-वडिलांनी दिली. मात्र कोणतेही औषध उपचार बाळाला मिळाले नाही. गरोदरपणात कोणतीही आवश्यक घ्यावयाची काळजी आरोग्य विभागाने घेतली नाही. अंगणवाडीतून गरोदरपणात आणि बाळ झाल्यानंतर मिळणारी मदत मिळाली नाही, त्यामुळे बाळाला पोषक दूध देऊ न शकल्याने हे दीड महिन्याचे बाळ दत्तक नातेवाईकांना सांभाळण्यासाठी दिल्याचं सांगितले. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडून समिती देखील गठीत करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र या समितीच्या चौकशीत आणि पोलीस तपासात नेमकं काय समोर येत आहे, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. घोटी पोलिसांकडून तात्काळ या मुलांचा शोध घेण्यासाठी तीन पथके शहापूर, ठाणे आणि इतर भागात रवाना करण्यात आली आहे. पोलीस तपासात आणि समितीच्या चौकशीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.























