Nashik : छत्रपती संभाजीराजेंचा फोन, नाशिक शहरातील मराठा बांधवाचं आमरण उपोषण स्थगित , मात्र साखळी उपोषण सुरूच!
Nashik News : छत्रपती संभाजीराजेंचा (Chatrapati sambhajiraje) फोन आल्यानंतर नाशिकमधील उपोषण मागे घेतले आहे.
नाशिक : मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) मागील नऊ दिवसांपासून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अखेर उपोषण मागे घेतले असून साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे. नाशिकमध्ये (Nashik) देखील मराठा बांधव नाना बच्छाव यांनी वारकऱ्यांच्या हातून सरबत घेत आमरण उपोषण मागे घेतले आहे. छत्रपती संभाजीराजेंचा (Chatrapati sambhajiraje) फोन आल्यानंतर हे उपोषण मागे घेतले आहे. मात्र येथील साखळी उपोषणाबरोबरच जिल्ह्यात साखळी उपोषण कायम आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) राज्य सरकार गंभीर असून, त्यासाठी 8 डिसेंबरला विशेष अधिवेशन बोलवू, असे आश्वासन राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल, तर राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी 2 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून देतो, असे सांगत आपल्या नऊ दिवसांच्या उपोषणाची सांगता केली. सरकारसाठी ही शेवटची वेळ असेल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर महाराष्ट्रातील मराठा बांधवाचे आंदोलन देखील शमले असून नाशिकमधील (Nashik Protest) उपोषणकर्ते नाना बच्छाव यांनी देखील आमरण उपोषण मागे घेतले आहे. मात्र साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या 52 दिवसापासून नाना बच्छाव यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण, तर 6 दिवसापासून आमरण उपोषण सुरू होते. काल रात्री आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुटल्याने त्यांच्या सूचनेनुसार आज नाशिकला नाना बच्छाव यांचे आमरण उपोषण वारकऱ्यांच्या हातून सरबत घेऊन सुटले आहे, मात्र शिवतीर्थावर साखळी उपोषण सुरूच राहणार आहे. दरम्यान नाशिकच्या सिडको भागातील मराठा तरुणांवर गुन्हे कसे दाखल होतात? हे दुर्दैव आहे. तसेच मराठा युवकांवरील गुन्हे मागे घ्या, मराठ्यांच्या मुळावर उठू नका, अधिकाऱ्यांची बदली रद्द करा असे पत्र देखील आयुक्तांना देण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी फोनवरून उपोषणकर्ते नाना बच्छाव यांना फोन करत उपोषण सोडण्याची विनंती करत मराठा युवकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मी प्रयत्न करेन, असे आश्वासन देखील दिले.
अन्यथा मुंबईची आर्थिक नाडी थांबवू....
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात गेले होते. या शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी शुक्रे, एम. जी. गायकवाड, धनंजय मुंडे यांचा समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाने याप्रश्नी घाईगडबड न करता टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या कालच्या आवाहनानुसार गाव खेडे शहरातील मराठ्यांनी मराठा आंदोलनासाठी उभे केलेले साखळी उपोषणे सुरू ठेवावी. त्यानंतर आमरण उपोषणे मागे घ्यावे, शांततेच्या आंदोलनाने सरकारला जागे करा, येत्या दोन महिन्यांच्या वेळेत मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावे, अन्यथा 24 डिसेंबरपर्यंत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास मुंबईची आर्थिक नाडी थांबवू, पाच कोटी मराठा मुंबईच्या सीमा अडवतील, असा इशारा मराठा बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी :