एक्स्प्लोर

Maratha Reservation : 'या' जिल्ह्यात झाली कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात, प्रशासनाच्या हालचालींना वेग

Maratha Reservation :राज्य सरकारच्या निर्देशानंतर आता कुणबी प्रमाणपत्र वाटपास राज्यातील अनेक भागात सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे.

परभणी : कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) वाटपास अखेर सुरुवात झाल्याचं चित्र सध्या राज्यात आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दोघा जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. मराठवाड्यातील (Marathwada) कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासंदर्भात राज्य सरकारने (Government) आदेश दिले. त्यानंतर मराठवाड्यातील धाराशिवनंतर परभणी जिल्ह्यात देखील दोन लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

परभणीच्या पालम तालुक्यातील वरखेड येथील शैलेश दशरथ घोडके आणि तुकाराम भुजंगराव गरुड या युवकांना आज पहिले कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या प्रशासनाच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.  

मनोज जरांगेंची सरसकट कुणबी प्रमाणपत्रांची मागणी

दरम्यान मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलीये. त्यामुळे जर सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार असेल तरच सरकारला वेळ देणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिली. दरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा वेळ दिल्यानंतर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात देखील करण्यात आली. दरम्यान यामुळे प्रशासनाच्या हालचालींना देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.  प्रत्येक जिल्ह्यात 10 जण मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात काम करतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.  शिंदे समितीनं देखील दिवस रात्र काम केल्याची माहिती देखील मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन

कुणबी प्रमाणपत्राबाबत समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. तसेच या बैठकीमध्ये  मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीच्या कामाचा देखील आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधण्यात आला असून यामध्ये दोन स्तरावर काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुणबी जातप्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेला राज्यभरात वेग देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी ही तातडीची बैठक बोलावली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 

मनोज जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलीये. तर राज्य सरकारकडूनही यावर वेगाने काम सुरु आहे. दरम्यान जरांगेंनी सरकारला दिलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये कुणबींना प्रमाणपत्र दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. 

हेही वाचा : 

Maratha Reservation : जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

महत्त्वाच्या बातम्या

'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Embed widget