Samrudhhi Highway Accident : अपघात कोणत्याही रस्त्यावरचा असू दे, गेलेल्या जीवाचं मोल होऊ शकत नाही, मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया
Samrudhhi Highway Accident : गेलेल्या जीवाचे मोल होऊ शकत नाही, तो परत पण येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली.
Dada Bhuse : समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) झालेल्या अपघाताची सविस्तर चौकशी करण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर अपघात समृद्धी महामार्गावरचा असू दे किंबहुना साध्या रस्त्यावरचा असू दे गेलेल्या जीवाचे मोल होऊ शकत नाही, तो परत पण येऊ शकत नाही, त्यामुळे घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway Accident) काल मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. यात बारा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य 22 जण जखमी झाले आहेत. यात सर्वाधिक मृत हे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आहेत. एकीकडे समृद्धी महामार्गावर अपघाताची (Accidents) मालिका सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यावर सर्वच राजकीय नेत्यांकडून संवेदना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. मंत्री दादा भुसे यांनी देखील प्रतिक्रिया देत दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. दादा भुसे म्हणाले की, अपघात समृद्धी महामार्गावरचा असू दे किंबहुना साध्या रस्त्यावरचा असू दे गेलेल्या जीवाचे मोल होऊ शकत नाही, तो परत पण येऊ शकत नाही. या गोष्टीची कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्यांना जाणीव असल्याचे ते म्हणाले.
दादा भुसे पुढे म्हणाले की, आजचा जो अपघात आहे, त्यानुसार जी माहिती समोर आली आहे कि, उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागे गाडी धडकली असं बोललं जात आहे. मी आता जिथे अपघात झाला आहे, तिथे प्रत्यक्ष पाहणीसाठी जात असून जी काही वस्तुस्थिती आहे, ते चौकशीतून समोर येईल, आता समजा अशी घटना झाली असेल, त्यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. बसमध्ये चौकशीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी समोर येतील, नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. अधिवेशन काळात यावर सविस्तर चर्चा झाली असून त्यावर उपपयोजना करण्यात आलेल्या आहेत. काही काम सुरु झाली आहेत. काही काम येणाऱ्या काळात संपन्न केले जातील.
एक कुटुंबच उध्वस्त!
दरम्यान अपघात इतका भीषण होता की टेम्पो ट्रँव्हलर्सचा (Travls Accident) चेंदामेंदा झाल्याचे दिसून आलं. यात सर्वाधिक अकरा मृत हे नाशिक जिल्ह्यातील वेगवगेळ्या भागातील असून संबंधित कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यात नाशिक शहरातील समतानगर येथील 32 वर्षीय काजल लखन सोळसे, त्यांची 5 वर्षीय मुलगी तनुश्री लखन सोळसे, शहरातील राजूनगर येथील झुंबर काशिनाथ गांगुर्डे, अमोल झुंबर गांगुर्डे, सारिका झुंबर गांगुर्डे हे कुटुंबच उध्वस्त झालं आहे. तर राजूनगर येथीलच पंजाबी रमेश जगताप यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. निफाड तालुक्यातील संगीता विलास अस्वले (वनसगाव), हौसाबाई आनंदा शिरसाट (उगाव), मिलिंद हिरामण पगारे (कोकणगाव), दीपक प्रभाकर केकाने (बसवंत पिंपळगाव) यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. नाशिक शहरापासून जवळच असलेल्या गौळाणे येथील रजनी गौतम तपासे यांचाही समावेश आहे.
इतर महत्वाची बातमी :