Nashik Lalit Patil : ललित पाटील नाशिकमध्ये महिलेला भेटला, 25 लाख रुपये घेऊन पसार झाला, काय घडलं त्या भेटीत? कोण आहे ती महिला?
Nashik Lalit Patil : ललित पाटील फरार झाल्यानंतर नाशिकमधील एका महिलेला भेटला , येथूनच 25 लाख रुपये घेऊन पसार झाल्याचे समोर आलंय.
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर तो ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर दोनदा नाशिकमध्ये आल्याचे उघडकीस आले. या दरम्यान ललित पाटील नाशिकमधील एका महिलेला भेटला असून येथूनच २५ लाख रुपये घेऊन पसार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याचबरोबर संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडून सात किलो चांदी ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात वेगवेगळे धागेदोरे समोर येत असून पंधरा दिवसांच्या तपासांनंतर अखेर ललित पाटील यास अटक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी ललित पाटील या पंधरा दिवसात कुठे कुठे गेला याबाबत माहिती देण्यात आली. या धक्कादायक बाब उघडकीस आली की, ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित पाटील हा दोनदा नाशिकमध्ये वास्तव्यास आला होता. या दरम्यान त्याने एका महिलेसोबत भेट घेत तिच्याकडून तब्बल 25 लाख रुपये घेऊन गेला. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने त्या महिलेकडे 25 लाख रुपये आणून दिले होते. ते पैसे घेऊन ललित पाटील पसार झाला होता. ललित पाटील एका दिशेला तर त्याचा भाऊ भूषण पाटील दुसऱ्या बाजूला पसार झाले होते. मात्र तीन दिवसांपूर्वी त्याचा भाऊ भूषण पाटील पोलिसांच्या जाळ्यात सापडला तर आज ललित पाटील यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
दरम्यान नाशिक पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी ललित पाटील नाशिकला कुणाला भेटला याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, नाशिक आयुक्तालयात 12 ग्रॅम एमडी संदर्भात गुन्हा दाखल होता. त्यातील 3 आरोपी अटकेत होते, तर त्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून इंदिरानगर हद्दीत 3 आरोपी अटकेत होते. 2 अजून निष्पन्न झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोडावूनमध्ये ड्रग्स सापडल्याप्रकरणी 3 आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर ललित पाटील प्रकरणाचा तपास नाशिक पोलीस करत होते. या दरम्यान ललित पाटील हा एक दिवस नाशिकला आल्याचे समोर आले. ललित पाटील हा एका महिलेकडे नाशिकमध्ये वास्तव्यास होता. यावेळी महिलेकडून पैशांची देवाणघेवाण झाल्याचे देखील समोर आले. या प्रकरणी संबंधित महिला पुणे पोलिसांच्या ताब्यात असून तिच्याकडून 7 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. नेमकी ही महिला कोण आहे ? हे अद्याप समजू शकलेले नाही.
ललित पाटीलचे आई वडिलांना अश्रू अनावर
ललित पाटीलचे आईवडील म्हणाले की, 'आमची मनस्थितीच नाही, आज काहीही एक बोलण्याची, ललित पाटील गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात होता. त्यामुळे आमचा काहीच संपर्क येत नव्हता. त्यामुळे त्यांनी हे ड्रग्ज रॅकेट कधी सुरू केलं, याबद्दल काहीच माहिती नाही जर आम्हाला याबाबत माहिती असती तर आम्ही नक्कीच त्याला सांगितलं असतं की हे चुकीचं आहे, हे करू नको, मात्र आम्हाला एक दीड वर्षात काय चाललंय, याबाबत कल्पनाच नव्हती, असेही त्या यावेळी म्हणाल्या. पोलिसांची कारवाई आम्हाला मान्य आहे. आमची दोन्ही मुलं असं काही करतील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. गेल्या तीन वर्षात आम्ही कधी भेटलो ही नाही, एक प्रकारे आम्ही त्याला सोडूनच दिलेलं होतं, अशी मुलं गेलेली बरी, अस सांगताना ललित पाटीलच्या वडिलांना रडू कोसळलं.
इतर महत्वाची बातमी :