Nashik News : नाशिक शहरात डोळ्यांची साथ पसरतेय, मनपाचा महत्वपूर्ण निर्णय; आजपासून चौदा दिवस उद्याने बंद
Nashik News : डोळ्यांची साथीमुळे नाशिक शहरातील उद्याने आजपासून पुढील चौदा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक : राज्यभरात डोळ्यांची साथ (Eye Flue) फैलावत असून यात लहान मुलांना अधिक लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. नाशिक शहरातही साथीचा प्रसार होत असून हजारो रुग्णांना त्याची लागण झाली आहे. त्यामुळे नाशिक मनपाने (Nashik NMC) महत्वपूर्ण निर्णय घेत शहरातील उद्याने आजपासून पुढील चौदा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डोळ्यांची साथ आटोक्यात आणण्यासाठी एक भाग म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात डोळे आल्याची लागण झालेल्या बाधितांचा आकडा लाखांच्या पुढे सरकला आहे. रोज त्यात नवीन रुग्णांची भर पडत आहे. नाशिकमध्येही (Nashik) ही साथ पिकमोडवर असल्याचे दिसत असून मनपा रुग्णालयातील ओपीडीत डोळे तपासणीसाठी मोठी गर्दी होत आहे. गेल्या महिन्यापासून नाशिक शहर आणि परिसरात सुरू झालेली डोळे येण्याची साथ अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसून, दिवसाकाठी तीनशे हे चारशे रुग्ण महापालिकेच्या (NMC Hospital) रुग्णालयात उपचार आणि तपासणीसाठी येत असल्याचे समोर आले आहे. त्यातच मुलांमध्ये ही साथ पसरू नये, म्हणून महापालिकेच्या उद्यान विभागाने आता 18 ते 31ऑगस्ट यादरम्यान शहरातील साधारण साडेचारशे उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून उद्याने बंद करण्यात आली आहेत.
उद्यान अधीक्षक विवेक भदाणे (Vivek Bhadane) यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे की, नाशिक शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांसह लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. डोळ्यांची साथ संसर्गजन्य असल्यामुळे लहान बालकांमध्ये त्याचा प्रसार अधिक आणि पटकन होतो. सध्या लहान मुलांच्या शाळांमध्ये साधारण पहिल्या घटक चाचणीचे सत्र सुरू असून लहान बालकांना डोळ्याच्या आजाराचा संसर्ग झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे लवकर डोळ्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी उद्याने 18 ते 31 ऑगस्ट यादरम्यान उद्याने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सद्यस्थितीत मागील 26 जुलै ते आजपर्यंत मनपा रुग्णालयात साडेपाच हजार डोळे आलेल्या रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
उद्याने हाॅटस्पाॅट ठरण्याची भिती
राज्यभरात डोळ्यांची साथ पसरली असून हा संसर्गजन्य आजार असल्याने तिचा फैलाव झपाट्याने होतो. नाशिक महापालिकेने याबाबत शाळांना सतर्कतेचा इशारा देत ज्यांचे डोळे आले, त्यांना चार दिवस सुट्टी द्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. उद्यानांमध्येही खेळण्यासाठी लहान मुलांची गर्दी होते. त्यामुळे डोळ्यांची लागण संसर्गासाठी उद्याने हाॅटस्पाॅट ठरण्याची भिती आहे. लहान मुलांना लवकर डोळ्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी सांगितले. हा धोका ओळखत आयुक्तांनी 18 ते 31 ऑगस्ट या कालावधीत शहरातील उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश उद्यान विभागामार्फत जारी केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Viral Infection : राज्यात साथीच्या आजारांनी डोकंवर काढलं; मुंबई, गडचिरोलीत मलेरियाचे 80 टक्के रुग्ण