एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : "ज्यांनी शिकवलं तेच आमचे देव"; शिंदे-फडणवीसांसोबत आलो म्हणून भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण 

Nashik News : संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही, हे स्पष्ट करा? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

नाशिक : बहुजन समाजातील मुलामुलींसाठी अनेक महापुरुषांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. म्हणून आजच्या मुला मुलींनी अशा महापुरुषांना पुजले पाहिजे. हे आमचे देव आहेत, याची पूजा आपण करायला पाहिजे, यात गैर काय? हे आजही बोललो, यापूर्वीही बोललो होतो आणि आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आम्ही सामील झालो, म्हणजे मी माझी भूमिका बदलेल, असं होणार नाही, असे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहे. 

मविप्र समाजाच्या (Nashik) वतीने काल समाज दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी 'ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या. त्यांनी सर्वांना का नाही शिकवलं? आपण आपले देव ओळखायला शिका, अशा आशयाचे वक्तव्य केले. यावरून राजकीय वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. यावर आज छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत कुठेही गेलो तरी भूमिका बदलणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. भुजबळ म्हणाले की, आमच्या अनेक महाविद्यालयात जशा शाखा आहेत, त्यानुसार शिक्षण महर्षींच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत. ज्यांनी मुला मुलींना शिक्षण प्रवाहात आणलं, त्यांना पुजलं पाहिजे. यात कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचे भुजबळ म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (MVP Collage) कार्यक्रमानिमित्त गेलो असताना तिथे रावसाहेब थोरात (Raosaheb Thorat) यांच्यापासून ते वसंतराव पवार यांच्यापर्यंत फोटो होते. मी नेहमीच सांगत आलोय की, आपल्याला शिक्षणाची कवाडे ही सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, फातिमाबी शेख, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar), भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात अशा अनेक महापुरुषांनी खुली करून दिली आहेत. हे आमचे देव आहेत, याची पूजा आपण करायला पाहिजे यात गैर काय? हे आजही बोललो, यापूर्वीही बोललो होतो. आणि आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आम्ही सामील झालो, म्हणजे मी माझी भूमिका बदलेल असं होणार नाही. फुले शाहू आंबेडकरांची भूमिका बदलणार नाही. 

माझ्या घरात सगळे देव आहेत.... 

छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुलेंना भिडेंनी वाडा दिला, म्हणून शाळा सुरू झाली. महात्मा फुलेसोबत चिपळूणकर, कर्वे होते. पूर्वी ब्राम्हणांच्या मुलींना सुद्धा शिक्षण घेता येत नव्हते, त्यावेळी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, यावर ऐतिहासिक पुराव्याद्वारे चर्चा करता येईल. म्हणून मी हे मांडलं. त्यामुळेच हे सर्व माझ्यासाठी देव असल्याचे भुजबळ म्हणाले. यावरही इतर लोक म्हणाले की, मग इतर देव चालत नाहीत का? तर मी म्हणालो माझ्या घरात सगळे देव आहेत. त्या प्रत्येकाची आमच्या घरात पूजा होते. प्रत्येकाच्या घरात देव असतात, त्यामुळे देवाची पूजा घरात होत असते. प्रत्येकाला जे जे वाटतं, ते प्रत्येकजण  घरात करत असतो. त्यामुळे तो प्रश्न उपस्थित होत नसल्याचा भुजबळ म्हणाले. 

संभाजी नाव लावण्याची आवश्यकता का भासली?

संभाजी भिडे यांचे नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही, हे स्पष्ट करा? असा सवाल उपस्थित करत जर ते मनोहर कुलकर्णी आहेत, तर संभाजी हे नाव लावण्याची आवश्यकता का भासली? असा प्रश्नही बाभुजबल यांनी उपस्थित केला. त्यांनी आपल्या नावाने स्पष्टपणे प्रबोधन केलं पाहिजे, परंतु हे नाव घ्यायचं आणि बहुजन समाजामध्ये जायचं, ते बरोबर होत नाही. ते सभांमधून काय प्रसार करतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही, त्यामुळे अशा गोष्टींना आम्ही विरोध करणारच असा इशारा देखील यावेळी भुजबळ यांनी दिला. तसेच मी कुठेही गेलो तरी माझी भूमिका बदलणार नाही असं स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhagan Bhujbal : ब्राम्हण समाचाजा अपमान करायचा नव्हता, पण सरकारमध्ये आलो म्हणून विचार बदलणार नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav Ratnagiri : थेट बसमध्ये चढले.. भास्कर जाधावांनी मानले मतदारांचे आभारSambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Embed widget