एक्स्प्लोर

Nashik News : मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया 

Nashik Chhagan Bhujbal : मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे. 

नाशिक : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत! राज्यात होणाऱ्या शांततामय आंदोलनास आम्हा सर्वांचा पाठींबा आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

जालना (Jalana) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी (Maratha Kranti Morcha) पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून संभाजीराजे छत्रपती, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील सरकारवर रोष व्यक्त करत घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील घटनेचा आढावा घेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, "मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. आम्ही सर्वजण सरकारच्या वतीने न्यायालयीन लढाई ताकदीने लढत आहोत." 

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, "काल जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजबांधव शांततेत आंदोलन करत होते. त्यांच्यावर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्या व बळाचा वापर केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. काल झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची ठाम भूमिका आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तसे निर्देश दिले आहेत. मी राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो व या लढाईत आम्ही सारे मराठा आंदोलकांसोबत आहोत, असे आश्वासित करतो!" छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. 

अनेक राजकीय नेते घटनास्थळी 

दरम्यान जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यानंतर गोंधळ उडून हिंसक आंदोलनात रुपांतर झाल्याचे समोर आलं. या घटनेमुळे राजकीय नेत्यांनी सरकारवर रोष व्यक्त केला असून अनेकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान आज संभाजीराजे छत्रपती यांनी गावात जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे देखील आज घटनास्थळी जाऊन आंदोलकांना भेटणार आहेत. 

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Protest : नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड, स्वराज्य संघटना आक्रमक; जालना घटनेच्या निषेधार्थ आंदोलन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Embed widget