Nashik Crime : डोळ्यांदेखत चोरी; ट्रायल घेण्यासाठी दुचाकी घेऊन गेला, तो परत आलाच नाही, नाशिकमधील घटना
Nashik Crime : ट्रायलसाठी (Trial Run) दुचाकी घेऊन गेलेला युवक परत आलाच नाही, नाशिक शहरात ही घटना घडली आहे.
Nashik Crime : चोरी करण्यासाठी चोर काय काय फंडे वापरतील हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार नाशिक (Nashik) शहरात घडला आहे. दुचाकी घेण्यासाठी आलेल्या युवकाने ट्रायलसाठी दुचाकी घेतली. (Trial Run) मात्र त्यानंतर तो दुचाकी घेऊन परतलाच नाही. एक तास वाट पाहुनही तो युवक परत न आल्यामुळे संबंधित मालकाने पोलीस ठाण्यात (Police Station) धाव घेतली. संबंधित तक्रारदारास दुचाकी विक्री चांगलीच महागात पडली आहे.
नाशिक (Nashik) शहरातील सिडकोतील महाकाली चौकात ही घटना घडली आहे. संबंधित तक्रारदाराने स्वतःची गाडी विक्रीसाठी काढली होती. त्यामुळे त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला होता. यासाठी त्याने दुचाकी विक्रीची जाहिरात संबंधित सोशल मीडिया माध्यमातून केली होती. यावेळी ट्रायल घ्यायला आलेला युवक दुचाकी घेऊन फरार झाला. आपल्या दुचाकीचे फोटो विक्रीकरता फेसबुक आणि ओएलएक्समध्ये टाकल्याने तक्रारदार तरूणास चांगलेच महागात पडले आहे.
नाशिक शहरात वास्तव्य करणाऱ्या प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्याकडे यामाहा कंपनीची दुचाकी होती. काही कारणास्तव जगताप यांना त्यांची दुचाकी विकायची होती. त्यांच्या दुचाकीचे फोटो फेसबुक आणि ओएलएक्सवर फोटो अपलोड केले. त्यानुसार अनेक नागरिकांनी फोन केले, अनेक व्यक्तींनी स्वतः भेट घेऊन दुचाकी बघितली. मात्र बुधवारी अज्ञात व्यक्तीचा फोन प्रशांत जगताप यांना आला. 'मला तुमची गाडी आवडली आहे. मला ती गाडी घ्यायची आहे. आपण कुठे भेटू शकतो, असे फोनवर दोघांचे बोलणे झाले. बोलणे झाल्यानंतर, जगताप यांनी समोरील संशयिताला शुभम पार्कजवळील भावसार ज्वेलर्स या ठिकाणी भेटण्यास सांगितले. दुपारी सुमारे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान जगताप आणि संशयित भेटले.
सोशल मिडियावर केली जाहिरात
दरम्यान दोघांची भेट झाल्यावर संशयित युवकाने गाडी बघितली. त्यावर तो चांगली गाडी आहे, असेही म्हणाला. त्यानंतर जगताप यांना ट्रायल करता दुचाकीची चावी मागितली. जगताप यांनी देखील चावी दिली. यावेळी संशयित युवकाने ट्रायल करता दुचाकी घेऊन गेला, तो पुन्हा आलाच नाही. जगताप याने दहा मिनिटे, 20 मिनिटे, अर्धा तास, एक तास वाट पाहिली, पण त्याचा काही पत्ता नव्हता. अखेर जगताप यांनी ज्या नंबरवरून यांना फोन करण्यात आला होता. त्या नंबरला फोन केला असता तो नंबर बंद होता. जगताप यांनी खूप वेळ संशयितांची वाट बघितल्यानंतर त्यांना समजले की आपली फसवणूक झाली. जगताप यांनी पोलिस ठाणे गाठत संपूर्ण हकीकत सांगितली. जगताप यांच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे शहरात दुचाकीचोरांनी उच्छाद मांडला आहे. दररोज दुचाकीचोरीच्या घटना घडत असून, या प्रकारांना चाप लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.