एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar : हफ्ते थकल्याने चक्क दुचाकीवर नेली दुचाकी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Chhatrapati Sambhaji Nagar : दुचाकीवर चक्क दुसरी दुचाकी घेऊन जात असल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल झाला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News: मार्च महिनाअखेरीस सर्वत्र बँकांकडून कर्ज वसुलीसाठी कर्जदारांच्या मागे तगादा लावण्यात येत असल्याचे चित्र नेहमी पाहायला मिळते. अनेकदा थेट कारवाई देखील करण्यात येते. दरम्यान असाच काही प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) पाहायला मिळाला. एका शेतकऱ्याने कर्जावर घेतलेल्या दुचाकीचे (Bike) हफ्ते थकल्याने वाहनाच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याची दुचाकी जप्त केली आहे. मात्र जप्त केलेली दुचाकी कुण्या मोठ्या वाहनात नव्हे तर चक्क त्यांच्याच दुचाकीवर टाकून घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथे घडली. संबंधित कर्मचारी दुचाकीवर चक्क दुसरी दुचाकी घेऊन जात असल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल झाला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील रोटेगाव येथील एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फायनान्सवर दुचाकी विकत घेतली होती. मात्र, वेळेवर त्यांच्याकडून हफ्त्याची परतफेड न झाल्याने गुरुवारी (16 मार्च) फायनान्सचे दोन कर्मचारी रोटेगाव येथे त्या शेतकऱ्याच्या घरी गेले. यावेळी शेतकऱ्याकडे थकीत हफ्ते भरा नाहीतर दुचाकीची चावी द्या, अशी विनंती केली. मात्र, या शेतकऱ्याने पैसे भरण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दुचाकी जप्त करण्यासाठी चावीची मागणी केली. शेतकऱ्याने या कर्मचाऱ्यांनी दुचाकीची चावी दिली नाही. यामुळे त्या दोन कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याची दुचाकी उचलून सोबत आणलेल्या दुचाकीवर टाकून ते वैजापूर फायनान्स कार्यालयाकडे निघून गेले. 

अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला! 

दरम्यान रस्त्यावर चक्क दुचाकीवरच दुसरे वाहन घेऊन जाताना अनोखा प्रकार दिसून आल्याने अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये दुचाकी घेऊन जाताना चित्रीकरण केले. या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने थकीत असलेली रक्कम भरुन दुचाकी परत मिळवली असली तरी हे कर्मचारी दुचाकी घेऊन जातानाचा व्हिडीओ मात्र, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ 

नेमका काय आहे प्रकार? 

वैजापूर शहरातील एका नामांकित खासगी वित्तीय संस्थेने तालुक्यातील शहरानजीक असलेल्या रोटेगाव येथील एका शेतकऱ्याला दुचाकी घेण्यासाठी कर्ज दिले आणि कर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून दुचाकीच्या कर्जापोटी साधारणतः दहा हजार रुपये संस्थेचे बाकी होते. त्यावर व्याजाची रक्कमही आकारण्यात आली होती. कर्जाच्या परतफेडीची मुदत संपल्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्जदाराकडे तगादा सुरु केला. परंतु संबंधित कर्जदाराने प्रतिसाद न दिल्याने वित्तीय संस्थेने कर्मचाऱ्यांना दुचाकी जप्त करुन आणण्याचे आदेश दिले. त्यानंतर कर्मचारी दुचाकीवरुन कर्जदाराच्या घरी गेले आणि कर्मचाऱ्यांनी मागचा पुढचा विचार न करता ती दुचाकी उचलून थेट त्यांनी आणलेल्या दुचाकीवर ठेवून वैजापूर येथे संस्थेच्या कार्यालयात आणली. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar: पेटवलेल्या कचऱ्यातील बाटलीचा स्फोट, मुलगा गंभीर भाजला; पोलिसात गुन्हा दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget