एक्स्प्लोर

Nashik Crime : कपड्यांची पावती ठरली खुनाची साक्षीदार, नाशिकमधील कंपनी मॅनेजरच्या हत्येचा उलगडा

Nashik Crime : नाशिक शहरातील बहुचर्चित योगेश मोगरे खून प्रकरणी नाशिक पोलिसांनी हरियाणाहून संशयितांना ताब्यात घेतले आहे. कपड्याच्या पावतीवरुन कंपनी मॅनेजरच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील बहुचर्चित योगेश मोगरे खून प्रकरणी (Yogesh Mogare Murder Case) नाशिक पोलिसांनी हरियाणाहून संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरुन कपड्याच्या पावतीवरुन कंपनी मॅनेजरच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात काही दिवसांपूर्वी कंपनी मॅनेजरच्या खुनाची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण शहर हादरले होते. घरी परतत असताना संशयितांनी योगेश मोगरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करत रस्त्यावर सोडून कार घेऊन पळ काढला होता. यानंतर जखमी मोगरे यांना रस्त्याने जाणाऱ्या रिक्षाचालकने तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मोगरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या खुनाचा तपास करण्यासाठी चार पथके तयार करुन तपास सुरु केला होता. यानुसार मुंबईतील एखाद्या व्यक्तीचे अपहरण करुन खंडणीची मागणी करण्याच्या उद्देशाने हरियाणामधील दोन संशयित मुंबईत आले होते. मात्र अपहरणाचा कट रचण्यासाठी त्यांना कारची आवश्यकता असल्याने त्यांनी नाशिक गाठलं. संशयित पाथर्डी परिसरात असताना अंबड येथील रोहिणी कंपनीचे व्यवस्थापक योगेश सुरेश मोगरे आपल्या कारने घराच्या दिशेने जात होते. यावेळी मोगरे हे एका टपरीवर थांबले होते. त्यानंतर ते गाडीत येऊन बसले. यावेळी संशयितांनी हालचाल पाहून घेत जवळ जात दोघांनी कारची चावी हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोगरे आणि दोघांमध्ये झटापट झाली. मोगरे कार सोडत नसल्याने एका हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. तरीही, ते कार सोडत नसल्याने पुन्हा दुसऱ्या हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. 

दरम्यान मोगरे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर मोगरे यांची कारसह मुंबईच्या दिशेने पळून गेले होते. मात्र कारमध्ये इंधन कमी असल्याने त्यांनी   कुर्हेनजीक कार सोडून देऊन याच परिसरातील जंगलात दोघांनी रात्र काढली. शुक्रवारी दोघे जण ट्रकने नाशिक शहरात आले, इथून रेल्वेतून ते हरियाणाला गेल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

कपड्यांच्या पावतीवरुन खुनाचा उलगडा

कंपनी मॅनेजर योगेश मोरे यांची हत्या झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी पथके नेमून सर्वच ठिकाणी चौकशी करण्यास सुरुवात केली होती. मात्र कुठूनच काही हाती लागत नव्हते. पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे ठरवून घटनास्थळी चाचपणी केली. त्यावेळी त्यांना 80 मीटरवर संशयास्पद एक पिशवी दिसून आली. त्याची पाहणी केली असता त्यामध्ये नवीन कपडे आणि खरेदीची पावती आढळून आले. 

पुसट झालेला मोबाईल क्रमांक

या पावतीवर मोबाईल क्रमांक होता, मात्र यातील एक अंक पुसट,आल्याने दिसण्यास अडचण येत होती. त्यामुळे पोलिसांनी एका क्रमांकासाठी आधुनिक पद्धतीने तपास केला असता तो मोबाईल क्रमांक मुख्य आरोपीचा असल्याचे समोर आले. त्याचे लोकेशन मुंबई, नाशिक आणि हरियाणा दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानुसार पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे स्टेशनसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी दिसून आले. शिवाय, आरोपीचे लोकेशन हरियाणा मिळून आले. त्यानुसार पोलीस हरियाणामध्ये गेले. पोलिसांनी एका आरोपीला घरातून अटक केली. 

हेही वाचा

Nashik Crime : कंपनी मॅनेजर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात, रिक्षावाल्याची माणुसकी, दवाखान्यात नेलं, मात्र....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 23 Feb 2025 : ABP Majha : 6 PmUday Samant On Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर शिवसेनेची ऑफर स्वीकारणार?Rahul Narvekar On Manikrao Kokate : कोर्टाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतर ७ दिवसांमध्ये निर्णय घेणारUddhav Thackeray Gat On Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Pakistan : 151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
151 धावांवर फक्त 2 विकेट, पाहता पाहता पुढच्या 91 धावांत अख्खा पाकिस्तान नेस्तनाबूत; पांड्या अन् कुलदीपने नेमकी काय जादू केली?
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Embed widget