Nashik : मुलीची छेड काढल्याने आईचा संताप, टवाळखोरांना खुर्चीने दिला प्रसाद, नाशिकच्या रणरागिणीचे होतेय कौतुक
Nashik Crime News : मुलीची छेड काढल्याने आईने टवाळखोरांना चोप दिल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडली आहे. या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक : बदलापूरमधील शाळेत (Badlapur School Case) दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वत्र सोशल मीडियावर (Social Media) महिला, युवतींना स्वसंरक्षणाबाबत जनजागृती केली जात आहे. त्यातच आता मुलीची छेड काढल्याने आईने टवाळखोरांना चोप दिल्याची घटना नाशिकच्या सिडको (Cidco) परिसरात घडली आहे. या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या काही दिवसापासून अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील शिवशक्ती नगर परिसरात टवाळखोर रस्त्यावर उभे राहून महिला मुलीची छेड काढत होते. अशाच एका तरुणीची बुधवारी छेड काढल्यानं तिने आपल्या आईला याबाबतची माहिती दिली. त्या महिलेने टवाळखोर उभे असतात तिथे जाऊन ओळख पटविण्यासाठी मुलाला बोलावून घेतले.
खर्ची उचलून टवाळखोरांना चोप
त्यानंतर महिलेने टवाळखोराला जाब विचारल्याने त्याने हुज्जत घालण्यास सुरवात केली. यानंतर महिलेचा पारा चढला आणि महिलेने रणरागिणीचे रूप धारण करून टवाळखोरांना चोप देण्यास सुरुवात केली. बाजूनेच भंगार विक्रेत्याची हातगाडी जात असताना त्यावरची खर्ची उचलून महिला आणि तरुणींनी छेड काढणार्यांना धडा शिकवला.
महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर चार संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. महिलेने मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना धडा शिकवल्याने महिलेच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेजारच्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री केली, नंतर धमकावत अत्याचार केला; भिवंडीतील नराधम गजाआड