एक्स्प्लोर

Nashik Crime : नराधमाच्या क्रूर कृत्याचा आणखी एक बळी; नाशकात साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार, नेमकं काय घडलंय?

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे.

Nashik Crime Case : नाशिक : बदलापुरात चार वर्षांच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अख्खं बदलापूर मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं. मंगळवारी संपूर्ण देशाच्या नजरा बदलापूरवर खिळल्या होत्या. बदालपुरातील आंदोलनाला काही तास उलटत नाहीत, तोच नाशकातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशकात साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना उघडकीस आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळत आहे. नराधमानं साडेचार वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत असताना तिचं अपहरण केलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुकली राहत असलेल्या गावातील एका संशयितानं हे पाशवी कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. 

मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची सुटका केली. तर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकच्या वावी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. 

नेमकं काय घडलं? 

नाशिकच्या सिन्नरमध्ये धक्कादायक घटना घडली. सोमवारी संध्याकाळी चिमुकली आपल्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी गावातील एक परिचित तरुण चिमुकलीजवळ आला. टिल्लू असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळत आहे. याच तरुणानं चिमुकलीचं अपहरण केलं. बराच वेळी चिमुकली आली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. पण चिमुकली कुठेच सापडली नाही. त्याचवेळी चिमुकलीसोबतच हा तरुणही बेपत्ता असल्यानं सर्वांचा संशय बळावला. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र तात्काळ हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. चिमुकलीचं त्यानंच अपहरण केल्याचं समोर आलं. 

चिमुकली सापडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. उपचारानंतर तिला तिच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं. याप्रकरणातील संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्थानक आहे. त्यातंर्गत मरोळ हे छोटसं गाव आहे. तिथे ही धक्कादायक घटना घडली आहे.                               

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Coastal Road News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय प्रतिक्रिया दिली?Coastal Road Bandra : कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाची एक बाजू आजपासून खुलीदुपारी 3 या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 12 September 2024 Latest NewsBalasaheb Thorat on MVA : महाविकास आघाडीत 125 जागांवर सहमती, राहिलेलं जागावाटप लवकरच होईल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
Malaika Arora Father Death :  मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
Tata Motors Cars Discount : टाटांची मोठी ऑफर, फक्त 5 लाखात मिळणार कार, किती मिळतेय सवलत? 
Tata Motors Cars Discount : टाटांची मोठी ऑफर, फक्त 5 लाखात मिळणार कार, किती मिळतेय सवलत? 
Rajendra Raut: ... तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालावा; आमदार राऊतांचे आवाहन, बार्शीत ठिय्या
... तर 5 कोटी मराठ्यांनी विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार घालावा; आमदार राऊतांचे आवाहन, बार्शीत ठिय्या
Embed widget